विठू माऊली या मालिकेतील जानकी देवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंकिता भगत हिने नुकताच बाळाला जन्म दिला आहे. २५ नोव्हेंबर रोजी मुलगा झाला हो असे म्हणत तिने एक फोटो शेअर केला आहे. अंकिता भगत प्रेग्नन्ट असल्यापासूनच खूपच उत्साही पाहायला मिळत होती. आपल्या होणाऱ्या बाळाचा प्रत्येक अनुभव ती चाहत्यांसोबत शेअर करत होती. गरोदर स्त्रीला सुदृढ राहायचं असेल तर तिने संतुलित आहारासोबतच व्यायाम देखील करायला हवा, तुम्ही जर गरोदर असताना अजूनही व्यायाम करत नसाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम सुरू करा त्यामुळे डिलिव्हरीच्या वेळी तुम्हाला आणि बाळाला याचा नक्कीच फायदा होईल, असे म्हणणारी अंकिता बाळाचा जन्म होण्याअगोदर देखील नियमित व्यायाम करताना दिसत होती.

२५ नोव्हेंबर २०२१ रोजी अभिनेत्री अंकिता भगत हिच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले असून हातावर मेहेंदी सजवून तिने हा आनंदाचा क्षण साजरा केला आहे. अभिनेत्री अंकिता भगत हीने विठू माऊली या लोकप्रिय मालिकेत जानकी देवीची भूमिका साकारली होती. अभिनया शिवाय अंकिता उत्कृष्ट डान्सर आहे जीव फसला ह्यो जाल्यामंदी, आई तुझा डोंगर यासारख्या अनेक व्हिडीओ सॉंग्सच्या माध्यमातून अंकिता प्रेक्षकांसमोर आली होती. झी युवा वरील युवा डांसिंग क्वीन या रिऍलिटी शोमध्ये टॉप 6 फिनालिस्ट मध्ये देखील ती पोहोचली होती. सोशल मीडियावर विनायक माळीच्या शेठ माणूस, माझी बायको या सिरीजमध्ये ती झळकताना दिसली. या सिरीजमध्ये विनायक माळी आणि अंकिताची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकाना देखील खूपच आवडली होती. तिच्या ह्या व्हिडिओना लाखो हिट्स मिळाले होते. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अंकिताने गौरव खानकर ह्याच्यासोबत गुपचूप साखरपुडा केला होता तिच्या साखरपुड्याची बातमी मिडियामाध्यमात पसरली होती. त्यानंतर काही महिन्यांनी तिने मोठ्या थाटात लग्न केले होते.

अंकिता प्रेग्नन्ट असताना साई स्वर म्युजिक प्रस्तुत ‘आई तुझा डोंगर’ हे गाणं तिने शूट केलं ह्या गाण्यात तिला नृत्य सादर करायचं होतं. पण हवतंस तिला करता आलं नाही. परंतु डॉक्टरांना विचारूनच आणि स्वतःची व होणाऱ्या बाळाची पूर्ण काळजी घेऊन तिने हे गाणं शूट केलं होतं. प्रेग्नन्ट असतानाही अंकिता ह्या गाण्यात अतिशय उत्साहितपणे डान्स करताना दिसते १ नोव्हेंबर रोजी हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं आणि तिच्या ह्या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता . अंकिताने सोशल मीडियाच्या माध्यमातून बेबी शॉवरचे फोटो शेअर केले होते. तिच्या ह्या गोड बातमीने तिच्या चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा देखील दिल्या होत्या. तिने साकारलेला कोळी गीतावरील मी डोलकर हा म्युजिक व्हिडीओ खूपच गाजला होता. शिवाय गणपती अधिपती, व्हाट्स ऍप गर्ल हे म्युजिक व्हिडिओमध्ये ती झळकली आहे.