भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात काल तिसरा शेवटचा वनडे सामना खेळला गेला. भारताला या मालिकेत एकही समना जिकता आला नाही. कालचा सामना अगदी जिंकता जिंकता राहिला असला तरी विराटचे चाहते मात्र खूष असलेले पाहायला मिळतात. त्याच कारण देखील तसेच आहे. कालच्या वनडे सामन्या दरम्यान विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या मुलीला म्हणजेच वामीक कोहली हिला खांद्यावर खेळवताना पाहायला मिळाली. याच दरम्यात वामीक कोहली हिचा चेहरा प्रथमच कॅमेऱ्यात टिपण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या हैलोवीन च्या दिवशी क्रिकेटर इशान किशन, हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक मुलगा अगस्त्य ह्यांच्या सोबत रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सचदेव व मुलगी समायरा पाहायला मिळाल्या. ह्याच्या सोबतच आर अश्विन ह्याच्या आध्या आणि अखिरा ह्या देखील या हैलोवीन सोहळ्यात सामील झाल्या होत्या. पण सर्वांचेच लक्ष होते ते विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांच्याकडे लागून होत. विराटची पत्नी अनुष्का शर्मा हिने आपल्या मुलीला “वामीका” हिला कडेवर घेतल होत. त्या फोटोमध्येच काय आजवर कोणत्याही फोटोमध्ये विराटच्या मुलीचा फोटो समोरून घेण्यात आलेला नाही. लाइमलाईट पासून तिला कायम दूरच ठेवण्यात आलं आहे. आजवर तिचा चेहरा दिसणारा एकही फोटो सोशिअल मीडियावर झळकलेला नाही. यामुळेच चाहत्यांनी त्यादिवशी तरी विराटच्या मुलीचा चेहरा पाहायला मिळेल या आशेने सोशिअल मीडियावर फोटो शोधायला सुरवात केली. पण त्यांच्या हाती निराशाच आलेली होती. पण कालच्या तिच्या एका झलकमुळे आता अनेकांना त्याच्या मुलीचे फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळाले.

बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या मुला मुलींचा चेहरा मीडियासमोर येऊ देत नाही कारण त्यामुळे त्या प्रकाश झोतात येतात आणि उगाचच आपणही स्टार आहोत अशी कल्पना त्यांच्या मनावर बिंबते. अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या मुला मुलींचा चेहरा मीडियासमोर येऊ देत नाही कारण त्यामुळे त्या प्रकाश झोतात येतात आणि उगाचच आपणही स्टार आहोत अशी कल्पना त्यांच्या मनावर बिंबते.या कारणामुळेच विराटने आजवर मुलीचा चेहरा कधीही मीडियासमोर येऊ दिला नव्हता. पण कालच्या एका मिनिटाच्या व्हिडिओमुळे विराटची मुलगी वामीक कोहली अनुष्का कोहलीसोबत पाहायला मिळाली. सोशिअल मीडियावर आता तिचा तो व्हिडिओ आणि फोटोज चांगलेच व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. पण हे सर्व बाजूला ठेऊन भारतीय संघाने आणि खासकरून विराटने आपल्या करिअरकडे पाहत भारताला पुढील सामन्यांत यश मिळवून देण्याकडे लक्ष केंद्रित करायला हवे.