
मराठी अभिनेता आर्थिक संकटात सापडला आहे. गेले काही दिवस मित्रांच्या मदतीने फंडिंग गोळा करून त्याच्यावर उपचार केले जात होते, मात्र आता उपचारासाठी अधिकचे पैसे गोळा करण्यासाठी सोशल मीडियावर मदत मागितली जात आहे. डंकी चित्रपटात शाहरुख खान सोबत काम करणारा मराठी अभिनेता वरून कुलकर्णी याला नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरून कुलकर्णी याला गेले काही दिवस किडणीच्या विकारामुळे त्रस्त आहे. आठवड्यातून २ ते ३ वेळा त्याला डायलिसिस साठी जावे लागते. त्यामुळे जवळचे होते नव्हते तेवढे पैसे संपले आहेत. पण पुढील उपचार कसा करावा असा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा आहे.

वरून कुलकर्णी हा थिएटर आर्टिस्ट असून त्याने बॉलिवूड चित्रपटातूनही काम केले आहे. किडणीच्या विकारामुळे त्याला आता अंथरुणाला खिळून राहावे लागले आहे. उपचारासाठी जवळ पैसे नसल्याने वरूनच्या मित्रांनी आता फंडिंग गोळा करून त्याच्यावर उपचार केले. मात्र उपचारासाठी अधिकचे पैसे लागणार असल्याने त्यांनी सोशल मीडियावर वरूनच्या अजरपणाबद्दल माहिती दिली आहे. लोकांकडून शक्य तेवढी मदत होईल या विचाराने त्यांनी हा उपाय शोधला आहे. वरून हा एक गुणी अभिनेता आहे, तो सगळ्यांशी मिळून मिसळून असतो. आम्ही आतापर्यंत त्याच्यावर लागणाऱ्या उपचाराचा खर्च केला मात्र ही प्रक्रिया खूप खर्चिक असल्याने लोकांनीही त्याच्या मदतीला धावून यावे अशी विनंती त्याच्या मित्रांनी केली आहे.

दरम्यान वरून कुलकर्णी याने लहान असतानाच त्याच्या आई वडिलांना गमावले होते. स्वतःच्या कुशलतेवर त्याने अभिनय क्षेत्रात जम बसवला होता. अगदी शाहरुख खान, विक्की कौशल सारख्या बॉलिवूड स्टार्स सोबत त्याला अभिनयाची संधी मिळाली. मात्र किडणीच्या आजराने तो आता हतबल झाला आहे. पुरेसे पैसे नसल्याने डायलिसिस कसे करावे असा प्रश्न त्याच्यापुढे आणि मित्रांपुढे उभा आहे. त्याचमुळे त्याच्या मित्रांनी सोशल मीडियाचा आधार घेण्याचे ठरवले आहे.