बिग बॉसच्या घरात या सुप्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एन्ट्री…घरात जण्यासाठी चक्क मालिकेला दिला निरोप

मालिकेतील एखादं आवडतं पात्र अचानक बाजूला होतं तेव्हा कुठेतरी प्रेक्षकांचा हिरमोड होतो. कारण त्या पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक जागा बनवलेली असते. काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहच्या मन धागा धागा जोडते नवा या मालिकेची प्रमुख नायिका आनंदी मालिकेतून गायब झाली होती. तेव्हा प्रेक्षकांनी तिला परत आणण्याची मागणी केली. पण नुकतीच दिव्या सुभाषची या मालिकेत एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. असाच काहीसा प्रकार सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या बाबतीत घडला आहे. मालिकेच्या सुरुवातीपासून माईचे पात्र प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. पण आता माईच्या पात्राची मालिकेतून एक्झिट करण्यात आली आहे. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी हे पात्र एका उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्यांच्याविषयी एक आपुलकीची भावना आहे.

पण आता इथून पुढे वर्षा उसगावकर या मालिकेचा भाग नसणार आहेत. काही खाजगी कारणास्तव वर्षा उसगावकर यांनी मालिकेतून काढता पाय घेतला आहे त्यामुळे मालिकेच्या कथानकात बदल करून त्यांनी साकारलेल्या पात्राची एक्झिट केली आहे. पण असे असले तरी तुम्ही मालिका पाहत राहा असे आवाहन त्यांनी प्रेक्षकांना केले आहे. दरम्यान वर्षा उसगावकर यांनी या मालिकेतून एक्झिट घेण्याचे कारण समोर आलेले आहे. येत्या २८ जुलै पासून कलर्स मराठीवर मराठी बिग बॉसचा ५ वा सिजन सुरू होणार आहे. या शोमध्ये वर्षा उसगावकर यांना सहभागी होण्याची संधी दिली आहे. त्यामुळे त्यांनी या मालिकेतून काढता पाय घेतला असे बोलले जात आहे. मराठी बिग बॉसचा हा सिजन रंजक होण्यासाठी लोकप्रिय कलाकारांची एन्ट्री करण्यात येणार आहे.
त्यात वर्षा उसगावकर यांचेही नाव घेतले जात आहे. त्याचमुळे वर्षा उसगावकर यांनी सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेला निरोप दिला आहे. पण मालिकेत अजून बऱ्याच रंजक घडामोडी घडणार आहेत. अधिराजला त्याच्या पूर्वायुष्यातील घटनांचा उलगडा होत जाईल, शालिनीच्या तो जाळ्यात कसा अडकतो आणि यातून नित्या त्याला कशी साथ देते , शालिनी आणि अधिराजची टॉम अँड जेरी सारखी धरपकड अशा बऱ्याच घटना मालिकेतून घडणार आहे त्यामुळे तुम्ही ही मालिका जरूर पाहा अशी विनंती त्यांनी प्रेक्षकांना केली आहे.