वैजू नं १ हि मालिका स्टार मराठीवर प्रकाशित करण्यात आली होती. अगदी कमी कालावधीतच मालिकेला चांगले यश मिळाले होते. ह्या मालिकेत प्रमुख भूमिकेत समीर खांडेकर आणि सोनाली पाटील झळकले होते. सोनाली पाटील ह्या मालिकेनंतर देवमाणूस ह्या मालिकेत महिला वकील म्हणून पाहायला मिळाली होती. वैजू नं १ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेत झळकलेल्या गुजराती जोडप्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. या मालिकेत अभिनेता मिहीर राजदा आणि त्याची पत्नी अभिनेत्री नीलम पांचाळ यांनी एकत्रित गुजराथी जोडप्याची भूमिका साकारली होती.

अभिनेता मिहीर हा देखील माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत गुरुनाथच्या मित्राच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता. आता तो सोनी मराठीवर अजूनही बरसात आहे या मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहे. त्याची पत्नी अभिनेत्री नीलम पांचाळ राजदा हिची वैजू नं १ मराठीतील हि पहिलीच मालिका होती. त्याआधी तिने अनेक गुजराती चित्रपट आणि नाटकांत कामे केली आहेत. इतकंच नाही तर काही हिंदी मालिकांतही ती पाहायला मिळाली होती. नुकतीच अभिनेत्री नीलम पांचाळ हिने तिच्यावर झालेल्या आजारा बाबद एक भावनिक पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यात ती म्हणते ” माझ्या संपूर्ण शरीरावर असे फोड उमटले आहेत. हे काय आहे मला माहित नाही…पण हे बहुतेक फूड ऍलर्जी असावी किंवा आणखी काही. हे खूपच वाईट दिसत आहे. मी सध्या एका छोट्याशा शहरात शूटिंगसाठी आले आहे जिथे या आजारावर मला औषधं मिळणे कठीण आहे. काही वेळापूर्वीच मी औषधं घेतली आहेत आशा आहे की ती काम करतीलही…परंतु तरीदेखील तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा कारण प्रार्थनेत ताकद असते हे फोड माझ्या सर्व शरीरभर पसरले आहेत आणि ते असह्य आहे तुमच्या प्रार्थनेने नक्कीच जादू घडेल.”