Breaking News
Home / जरा हटके / कुत्र्याने मटण खाल्लं म्हणून बापानेच मुलीचं आयुष्य संपवलं तुळजापुरातील कार्ला येथे घडली धक्कादायक घटना

कुत्र्याने मटण खाल्लं म्हणून बापानेच मुलीचं आयुष्य संपवलं तुळजापुरातील कार्ला येथे घडली धक्कादायक घटना

एखाद्या छोट्या कारणाने डोक्यात गेलेला राग माणसाला कसा हैवान बनवू शकतो आणि त्या रागापायी स्वत:च्याच मुलीचा जीव घेण्यापर्यंत एक बाप निर्दयी होऊ शकतो याचा दाहक अनुभव देणारी घटना तुळजापूर तालुक्यातील कार्ला गावातील एका घरात घडली. मुलीने मटण बनवले आणि दुसऱ्या कामात लागली. दरम्यान बनवलेले मटण कुत्र्याने खाले. मटण कुत्र्याने खाल्ल्याचा राग आलेल्या वडिलांनी २० वर्षीय मुलीचा गोळी झाडून खून केला. मुलीचा जीव घेण्याआधी एक थरारक घटनाही घडली. मटण खायला मिळाले नाही म्हणून पोटच्या मुलीचा बळी घेणाऱ्या बापाचा गावात निषेध केला जात आहे. दुर्दैवी मुलीचं नाव काजल तर नराधम बापाचं नाव गणेश झंप्या भोसले असे आहे. काजल शिंदे ही विवाहित असून ती पतीसोबत आईवडीलांच्या घरी राहत होती. रविवारी घरी मटण आणलं होतं. काजलने मटणसाठी ग्रेव्ही बनवली आणि ती दुसऱ्या कामाकडे वळली. यावेळी घरातील कुत्र्याने मटण खाल्ले. कुत्र्याने मटण खाल्ल्याचे तिची आई मीरा यांनी पाहिले आणि त्यांनी काजलशी वाद घालायला सुरूवात केली.

usmanabad adhikshak karyalay
usmanabad adhikshak karyalay

हा वाद जोरदार भांडणापर्यंत पोहोचला. यावेळी काजलचे दारूच्या नशेत असलेले वडील गणेश हेही भांडणात सामील झाले. राग अनावर होताच त्यांनी संतापाच्या भरात घरातील बंदुकीने काजलवर थेट गोळीच झाडली. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजता घडली. वडीलांनी झाडलेली गोळी काजलच्या छातीत घुसल्याने ती गंभीर जखमी झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काजलला रूग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. काजलचा पती सुनील शिंदे यांनी उस्मानाबादच्या नळदुर्ग पोलिस ठाण्यात काजलची आई मीरा आणि वडील गणेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सध्या काजलच्या हत्याप्रक्रणातील आरोपी गणेश भोसले फरार आहे. काजलची आई मीराला अटक करण्यात आली आहे. गणेशच्या शोधासाठी पोलिसपथक रवाना करण्यात आलं असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published.