पठ्ठे बापुराव आणि पवळाचा जीवनप्रवास उलगडणार … दोघांनी स्वतःचाच ९०० रुपयांना लिलाव लावला मुंबईच्या अबू शेठनी
लोकशाहीत पठ्ठे बापूराव यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर उलगताना दिसणार आहे .प्रसाद ओक दिग्दर्शित “पठ्ठे बापूराव” या आगामी चित्रपटाचे पोस्टर आज घटस्थापनेच्या दिवशी प्रसिद्ध करण्यात आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अमृता खानविलकर आणि प्रसाद ओक प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. शाहीर पठ्ठे बापुरावची भूमिका प्रसाद ओक तर पवळाची भूमिका अमृता खानविलकर साकारत आहे. आबा गायकवाड यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे तर प्रकाश देवळे, सपना लालचंदनी, प्रभाकर परब, सचिन नारकर, विकास पवार यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान अमृता खानविलकर चंद्रमुखी चित्रपटानंतर पुन्हा एकदा दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पवळाची विलक्षण व्यक्तिरेखा साकारण्याची संधी दिल्याबद्दल तिने प्रसाद ओक तसेच निर्मात्यांचे आभार मानले आहेत. पठ्ठे बापूराव यांच्या आयुष्यात पवळा आली आणि त्यांणाची कला पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली. पवळा आणि पठ्ठे बापूराव या जोडीने तमाशाला एक नवे वळण मिळवून दिले. पवळाच्या पायात जणू जन्मजात नृत्य होते, तर शाहीर पठ्ठे बापूरावांनी गण, गौळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वगाच्या विपुल लावण्या रचल्या. त्यांची बरीचशी रचना आजही अनुपलब्ध आहेत . बहुतेक तमाशांत पठ्ठे बापूरावांच्या लावण्या गायल्या जात आणि सगळे तमासगीर त्यांना पूज्य मानत. बापूरावांच्या आयुष्यातून पवळा निघून गेल्यानंतर त्यांचा तमाशाचा व्यवसाय हळूहळू ढासळत गेला. दरम्यान दोघांची प्रसिद्धी वाढली असतानाच लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार घातला होता.
त्या दोघांनी स्वतःचाच ९०० रुपयांना लिलाव लावला. मुंबईच्या अबू शेठनी हा लिलाव जिंकला. त्यानंतर मुंबईच्या एल्फिस्टन थिएटरवर पवळा पठ्ठे बापूराव यांना पाहण्यासाठी तिकीट लावण्यात आले. पण पुढे बेबनावामुळे पवळाने पठ्ठे बापूरावांचा फड सोडून दिला. पठ्ठे बापूरावांनी दुसऱ्या एका स्त्रीला घेऊन तमाशाचा फड चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. अखेर हालअपेष्टा सोसणाऱ्या या महान कलाकारचे २२ डिसेंबर १९४५ रोजी निधन झाले. पवळा आणि पठ्ठे बापूराव यांचा हा जीवनप्रवास चित्रपटातून उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.