Breaking News
Home / जरा हटके / अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या देवीच्या रूपातील फोटोवर केलेल्या टीकेवर अपूर्वाने टीकेला दिले चोख उत्तर

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या देवीच्या रूपातील फोटोवर केलेल्या टीकेवर अपूर्वाने टीकेला दिले चोख उत्तर

अभिनेत्री आणि त्यांचं हटके फोटोशूट हे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतं. नवरात्रीच्या दिवसात देखील चाहत्यांचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी ही कलाकार मंडळी वेगवेगळ्या विषयाला अनुसरून फोटोशूट करताना दिसतात. गेल्या वर्षी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचे देवीच्या रूपातील फोटोशूट चांगलेच चर्चेत आले होते त्यालाच अनुसरून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने वेगवेगळ्या देवीच्या रुपातील फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत. अगदी कोल्हापूरची अंबाबाई, मुंबादेवी, जय गौरी दुर्गा परमेश्वरी, जगदंबा माता राशीनची देवी, त्रिणयन दुर्गामाता, एकविरा देवी, चंद्रपूरची महाकाली, सरस्वती अशा देवीच्या विविध रूपातील तिचे फोटोशूट तिच्या चाहत्यांना देखील खूपच भावले आहेत मात्र तिच्या काही चाहत्यांनी या फोटोशूटवर आपली नाराजी देखील दर्शवली आहे. या नाराजीवर अपूर्वाने एक उत्तर देखील दिलं आहे. याबाबत अधिक जाऊन घेऊयात…

actress apurva nemlekar
actress apurva nemlekar

अपूर्वा नेमळेकरच्या फोटोशूटवर नाराज झालेल्या चाहत्यांचे म्हणणे आहे की, “Dislike, Dislike,100% Dislike, आपण एवढं पूजनीय नसतो, सांगितलं ना, including I (मी) की देव देवीच्या face ल आपल face marf करून लावायला, बस झालं नका खेळू आमच्या emotion’s शी. आणि वाटलं तर हा pic बनवून तूम्ही घरात लावा, बघत बसा. पण pl.public वर काहीही नका लादू कळतं नाही एकदा पोस्ट ला कॉमेंट देऊन. आणि जितक्या द तूम्ही माझं comment delete कराल, मी तित्क्यादा हाच same comments, लोकं मधे हया बदल aewrness करणार, मग तूम्ही कुठंही हा marf pic Taka…” चाहत्यांच्या या नाराजीवर अपूर्वाने नुकतेच एक उत्तर दिले आहे त्यात ती म्हणते की, ” मी व माझ्या सहकाऱ्यांनी, प्रत्यक्ष-वा-अप्रत्यक्ष असा कधीच दावा केला नाही आम्ही दैवी व्यक्तिमत्त्वे आहोत. मी, आणि माझे सहकारी निव्वळ कलेचे उपासक आहोत. हा प्रकल्प, हि आमची एक संकल्पना आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही, देवीचे विविध रुप आणि त्या विशिष्ट शक्तीपीठाची महती भविकां पर्यंत पोहोचवन्याचा, एक निखळ प्रामाणिक प्रयत्न आहे.

apurva nemlekar photos
apurva nemlekar photos

आपल्या संस्कृतीचा वारसा लुप्त होत चालला आहे, त्याला उजाळा देण्याचा हा आमचा प्रामाणिक आणि निस्वार्थी प्रयत्न आहे. ह्या छोट्याश्या प्रकल्पात आम्हा सर्वांचा कोणताही व्यावसायिक हेतू वा फायद्या नाही. अश्या पद्धतीने, अप-समीक्षा उघड पने करणे म्हणजे आपल्या संसकृतीचे अवमान, आवज्ञा होय. वैयक्तिकरित्या एखाद्याला हि संकल्पना किंवा त्याची मांडणी पटली नसेल तर त्याने, दुर्लक्ष करावे, किमान सार्वजनिक व्यासपीठावर असे उदात विचार मांडून इतरांच्या भावनांचा अवमान करू नये. हिंदू संस्कृतीत सहिष्णुतेला नुसतेच प्राथमिक नाही तर अनन्य साधारण महत्त्व आहे.”परस्पर देवो भव” म्हणजेच एक मेकां मध्ये देव पाहा (See God in each other) अशी, आपल्या हिंदू संस्कृती ची शिकवण आहे. तेव्हा माझे व माझ्या सहकाऱ्यांचे आपल्याला वैयक्तिक आवाहन राहील की, आपण आपल्या संस्कृती चे विडंबन करू नये आणि ही अप प्रचिती इथेच थांबवावी !”

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *