Breaking News
Home / जरा हटके / तुझ्यात जीव रंगला मालिकेतील या अभिनेत्रीने अभिनेत्यासोबत नुकताच केला विवाह

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील या अभिनेत्रीने अभिनेत्यासोबत नुकताच केला विवाह

तुझ्यात जीव रंगला आणि गर्ल्स हॉस्टेलमधून नावारुपाला आलेली अभिनेत्री मुग्धा परांजपे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. गर्ल्स हॉस्टेलमधून आपला डॅशिंग अंदाज दाखवणारी मुग्धा आता लग्न बंधनात अडकली आहे. तिने प्रसिद्ध अभिनेते रविंद्र मंकणी यांच्या मूलाशी म्हणजेच सुश्रुत मंकणी याच्याशी लग्न केले आहे. सुश्रुत मंकणी यांचा भाऊ देखील अभिनेता आहे देवयानी या मालिकेत भाऊ रोहन मंकणी महत्वाच्या भूमिकेत झळकला या मालिकेमुळे तो प्रकाश झोतात आला होता.

actress mugdha paranjpe wedding
actress mugdha paranjpe wedding

अभिनेत्री मुग्धा परांजपे तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या लग्नाचे आणि हळदीचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये हळदीच्या समारंभात तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. हातावर सजलेली मेहंदी आणि गाली लागलेल्या हळदीने तिचं सौंदर्य फार खुलून दिसत होतं. हळदीच्या फोटोंमध्ये तिने मेहंदीचे देखील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये सुश्रुत देखील तिच्याबरोबर आहे. हा फोटो शेअर करत मुग्धाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी आणि माझं संपूर्ण जग.” अनेक कलाकार लग्नाचा भलताच थाट करताना दिसतात. मात्र मुग्धाने असे न करता अगदी साध्या पद्धतीने लग्न केलेलं पाहायला मिळतं आहे. तिने लग्नाचे देखील काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये एका फॅमिली फोटोत मुग्धा तिचा पती, आई – वडील, सासू – सासरे देखील खूप खुश दिसत आहेत. सुश्रुत आणि मुग्धाने एका फार्महाऊसमध्ये लग्न केलं आहे. मुग्धाने अभिनय क्षेत्रात बरेच काम केले. अशात ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत देखील ती झळकली होती.

actor rohan mankani and mugdha wedding
actor sushrut mankani and mugdha wedding

त्यानंतर देखील छोट्या पडद्यावर कायम सक्रिय होती अशात ‘गर्ल्स हॉस्टेल’ मधील नेहा हे पात्र साकारुन ती घराघरात पोहचली. मुग्धाचे सासरे म्हणजेच रवींद्र मंकणी यांनी मराठी चित्रपट , मालिका आणि नाटकांमधून अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रमा माधव, निवडुंग, बाप माणूस, वारसा लक्ष्मीचा, विट्टी दांडू, वास्तुपुरुष चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिले. तर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत सुश्रुत मंकणी यांचा भाऊ रोहन मंकणी हा देखील मराठी चित्रपट तसेच मालिका सृष्टीतुन प्रेक्षकांच्या समोर येत राहिला आहे. शेर शिवराज है, पावनखिंड हे त्याने अभिनित केलेले आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. कधी अचानक, फर्जंद यासारख्या चित्रपटातून तो झळकला आहे. सुश्रुत मंकणी आणि अभिनेत्री मुग्धा परांजपे या नवविवाहित दाम्पत्यास मनःपूर्वक शुभेच्छा…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *