तुझ्या इश्काचा नाद खुळा मालिकेतील रघु म्हणजेच अभिनेता संचित चौधरी याला नुकताच एक चोरीचा अनुभव आला आहे. संचित चौधरी हा शिक्षक आहे मात्र प्रेमाचा गेम सेम टू सेम मालिकेत त्याला नायकाची संधी मिळाली आणि आपला पूर्ण वेळ अभिनयाला देण्याचे त्याने ठरवले आहे. सध्या तो तुझ्या इश्काचा नाद खुळा मालिकेत रघुची भूमिका साकारत आहे. अनेक कलाकारांना प्रवासात चांगले वाईट बरेच अनुभव येतात काल संचितसोबतही अशीच एक घटना घडली ही घटना सविस्तरपणे अशी होती की… काल खूप खतरनाक किस्सा झाला…. नागपुर वरन प्लेन ने मुंबई ला आलो आणि Airport वरुन ऑटो केला आणि सरळ शूटिंग करता मढ आइलैंड ला जायला निघालो.

ऑटो मध्ये माझी एक ट्रॉली बॅग आणि माझ्या जवळ एक साईड पौच होता. रस्त्यात यारी road ला रीक्षा थांबवली कारण ATM मधन पैसे काढायचे होते…ऑटो मधन उतरलो ट्रॉली बॅग तिथेच ऑटों मध्ये ठेवली आणि साइड पौच घेऊन Atm मध्ये शिरलो…पैसे काढले आणि बाहेर पडलो. तर बाहेर बॅग बरोबर ऑटो गायब…माझी इतकी फाटली पाहिले 5 min मला believe च होत नव्हत की खरच ऑटो तिथे नाहीय. खूप पळालो मागे पुढे सगळी कडे ऑटो वाल्या ला खूप शोधल… obviously माझ्याकडे ऑटोचा नंबर नव्हता. बस ऑटो कसा दिसतो आणि ऑटो वाला with mask कसा दिसतो इतकचं माहिती होत. मग लगेच पोलीसांना बोलावून घेतल…त्यांनी आल्या आल्या लगेच आजू बाजूला असलेले CCTV चेक केले पण तिथल्या कुठल्याच कॅमेरा मध्ये ते capture होऊ शकल नाही..मग त्यांनी मला जवळच्या पोलिस स्टेशन ला म्हणजे वर्सोवा पोलीस चौकीत FIR करायला सांगितली.. मी लगेच वर्सोवा पोलीस स्टेशन ला गेलो..जाताना रस्त्यात खूप PRAY करत होतो की काही ही करून बॅग सापडू दे वगेरे कारण बॅग मध्ये फक्त कपडेच नाही.

तर माझं पासपोर्ट आणि बँके चे काही महत्वाचे डॉक्युमेंट होते. पोलिस स्टेशन ला आलो आणि आत जाताच होतो तर मला पोलीस स्टेशन च्या बाहेर तीच सेम रिक्षा दिसल्या सारखं वाटलं.. मी जवळ गेलो कन्फर्म काऱ्यला..ऑटो होता पण ऑटोवाला आणि बॅग नव्हती..मला तीच रिक्षा असल्याचं confirmation मिळालं मी लगेच आत गेलो आणि त्याचं काहीच ना आईकता पोलिसांना सांगायला लागलो की बाहेर ती रिक्षा आहे त्यात माझी बॅग चोरीला गेली होती ती रिक्षा आता इथेच बाहेर आहे वगैरे वगैरे मी खूप excited आणि खुश झालो होतो एकाच वेळी. त्यांनी मला शांत केलं बसवल आणि सांगितल की त्यांनीच त्या ऑटो वाल्याला पकडुन ईथे आणलय आणि तुमची बॅग पण आमच्या कडे आहे..त्यांनी बॅग लगेच मला दिली मी बॅग उघडून पहिली आणि नंतर…नंतर माझी smile बघून कळतच असेल तुम्हाला. so basically मला खरच खूप unexpected होत बॅग मिळण..but Thanks to @mumbaipolice त्यांच्या मुळे माझी बॅग मला परत मिळाली. मी गेल्या नंतर पण FIR व्हायच्या आधी त्यांनी त्या चोरीला seriously घेतलं आणि त्याला मी स्टेशन ला पोहोचायच्या आत पकडल.. भारी वाटलं. अश्याच सर्व पोलीस ऑफिसर्स ला आपला Thank you आणि hats off!!