झी मराठीवर सध्या “माझी तुझी रेशीमगाठ” ह्या नव्या मालिकेचा प्रोमो चांगलाच गाजतोय ह्या प्रोमोमध्ये झळकलेली लहान मुलगी सगळ्यांचाच लक्ष वेधताना पाहायला मिळतेय. अभिनेता श्रेयश तळपदे देखील बऱ्याच वर्षानंतर मराठी मालिकांत काम करताना पाहायला मिळणार आहेत. श्रेयश सोबत ह्या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आज आपण “माझी तुझी रेशीमगाठ” ह्या मालिकेत श्रेयश तळपदेला लग्नाची बोलणी करायला आलेल्या त्या लहान मुलीबद्दल जाणून घेणार आहोत.

“माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेत झळकणारी लहान मुळीच नाव आहे “मायरा वायकुळ”. मायराला तुम्ही ह्या पूर्वी देखील अनेक व्हिडिओ मध्ये पाहिलं असेलच. मायरा वायकुळने टिक टॉक सारख्या व्हिडिओजच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. टिक टॉक स्टार म्हणूनही तिची ओळख आहे. इन्स्टाग्रामवरही तिचे खूप फॉलोअर्स आहेत. युट्युबवर Myra’s corner नावाने मायराचे चॅनल आहेतिच्या व्हिडिओना लाखो हिट्स मिळताच शिवाय खुप साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन चाहते प्रोत्साहित देखील करतात मायराचे सर्व अकाउंट तिची आई हँडल करताना पाहायला मिळते. मायराचे वडील गौरव वायकुळ आणि आई श्वेता थोरात वायकुळ हे दोघेही मायराला सतत प्रोत्साहन देत असतात. आता तिला झी वाहिनी च्या माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे ह्या दोन प्रसिद्ध कलाकारणसोबत छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळत आहे अश्या तगड्या स्टारकास्ट सोबत झळकण्याची संधी मिळत असल्यामुळे तिच्या चाहत्यांत आणखीन वाढ होणार हे नक्की. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील कलाकारांना आणि चिमुरडी मायरा वायकुळ हिला मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा..