
स्टार प्रवाह वाहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत सुरुवातीपासूनच चिमुरड्या स्वराची संघर्षमय कहाणी पाहायला मिळत आहे. अवघ्या काही दिवसातच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. अर्थात मालिकेतील तगडे कलाकार ही जमेची बाजू म्हणावी लागेल. मालिकेत नुकतेच स्वराच्या आईचे निधन झाले त्यामुळे आता स्वरा एकाकी पडलेली पाहायला मिळत आहे. त्यात भर म्हणून की काय स्वराची मामीकडून गाणं गाऊन तिला पैसे कमवायला सांगत आहे. परंतु आईच्या इच्छेखातर स्वरा गाणं सोडायला तयार झालेली असते. परंतु गाणं गात नसल्याने स्वराला पोलिसांनी अटक केली आहे. मामीच्या जबाबवर स्वरा पोलिसांच्या तावडीतून सुटणार आहे. तिथेच स्वरा ही वैदेही आणि मल्हार कामतची मुलगी आहे हे मोनिकाला समजते. त्यामुळे आता आईच्या निधनानंतर स्वराला तिची ओळख लपवावी लागत आहे.

लवकरच मालिका एका रंजक वळणावर येऊ ठेपली आहे. मालिकेत एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतो आहे प्रेक्षकांना आता स्वराच्या जागी स्वराज पाहायला मिळणार आहे. जोपर्यंत स्वराचे वडील तिला भेटत नाहीत तोपर्यंत तिला मुलगा बनून राहावे लागणार आहे. आपल्या बहिणीच्या पश्चात तिच्या मुलीवर कुठली संकटं येऊ नयेत म्हणून स्वराचा मामा हा कठोर निर्णय घेताना दिसतो. मालिकेच्या पुढील भागात स्वराचे केस कापून तो आता तिला स्वराज बनवू पाहत आहे. पण मामाने असे का केले असावे हा मोठा प्रश्न या चिमुरड्या स्वरापुढे उभा राहिला आहे. एकीकडे स्वरा आता स्वराज बनून वावरताना पाहायला मिळणार आहे तर दुसरीकडे मल्हार त्याच्या पूर्वायुष्याबद्दल खुलासा करताना दिसणार आहे. मल्हारची पत्नी मोनिकाला देखील वैदेही कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. मोनिका सुहाणीसोबत पोलीस चौकीत जाते तिथे तिला श्यामला मामी वैदेही आणि मल्हारचा उल्लेख करताना दिसते. स्वरा ही मल्हारची मुलगी आहे हे आता मोनिकाला समजणार आहे. त्यामुळे मालिकेतला हा ट्विस्ट प्रेक्षकांना देखील पाहायला निश्चितच आवडणार आहे.