
स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका दाखल होत आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका येत्या २ मे २०२२ पासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आनंदाची बातमी म्हणजे या मालिकेच्या जागी असणारी मुलगी झाली हो या मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दुपारी २ वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार असल्याने ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत नसल्याचे निश्चित झाले आहे. तुझेच मी गीत गात आहे या नव्या मालिकेतून अभिनेत्रीचे तब्बल १२ वर्षांनी पुनरागमन होत आहे ही अभिनेत्री आहे उर्मिला कोठारे.

नुकताच या नव्या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्यात उर्मिला कोठारे स्वराच्या आईची म्हणजेच वैदेहीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या नव्या भूमिकेबाबत उर्मिला कोठारे खूपच उत्सुक आहे. खूप वर्षानंतर मी मालिकेत काम करत असल्याने वैदेहीचे पात्र साकारताना खूप धमाल येत आहे असे ती म्हणते. मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे , सेटवर खूप खेळीमेळीचे वातावरण असते. आतापर्यंत मी ग्लॅमरस भूमिकेत पाहायला मिळाली आहे मात्र वैदेहीचे पात्र माझ्यासाठी खूपच वेगळे आणि तितकेच आव्हानात्मक असणार आहे असे उर्मिला आपल्या या भूमिकेबाबत सांगते. शुभ मंगल सावधान, दुनियादारी, ती सध्या काय करते,टाईमपास, टाईमपास २, गुरू अशा चित्रपटातून उर्मिला मोठ्या पडद्यावर झळकली आहे. असंभव, मायका, मेरा ससुराल अशा मराठी आणि हिंदी मालिकांमधून उर्मिला मुख्य भूमिकेत झळकली होती. नुकतेच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत उर्मिलाने जजची भूमिका साकारली होती मात्र यात ती एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. त्यामुळे गेल्या कोटीएल वर्षानंतर आता उर्मिला छोट्या पडद्द्यावरून मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

गाण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या स्वराची ही कहानी आहे. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वरा आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहे. मात्र आपला बाप कोण? ह्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसलेल्या स्वराला याचा उलगडा कधी होणार हे मालिकेतून पाहायला मिळणार आहे. मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहेत हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते मात्र याबाबत नुकताच एक उलगडा करण्यात आला आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत स्वराची भूमिका “अन्वी तायवडे” या बालकलाकाराने साकारली आहे. अन्वी याअगोदर हिंदी मालिकेतून झळकली आहे. स्टार प्लस वरील ‘ये है चाहतें’ या मालिकेत अन्वीने साची ची भूमिका साकारली होती. सास बहू और साजीश , स्टोरी 9 मंथस की अशा हिंदी मालिकांमधून अन्वला महत्वाच्या भूमीका साकारण्याची संधी मिळाली आहे. हिंदि मालिका सृष्टी गाजवल्यानंतर अन्वी आता मराठी मालिका सृष्टीकडे वळली आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत ती मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अन्वीसाठी ही मालिका खूप खास ठरणार आहे. या मालिकेसाठी अन्वी तायवडे या बालकलाकराचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!…