Breaking News
Home / जरा हटके / तुमची मुलगी काय करते मालिकेतील अभिनेत्याचे थाटात पार पडले लग्न

तुमची मुलगी काय करते मालिकेतील अभिनेत्याचे थाटात पार पडले लग्न

मराठी सृष्टीतील बरेचसे नामवंत कलाकार येत्या काही दिवसातच लग्नबांधनात अडकणार आहेत. त्यात विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे तसेच हृता दुर्गुळे यांच्या लग्नाची घाई सुरू झालेली आहे. यांच्या सोबत मराठी सृष्टीतील आणखी एक हरहुन्नरी कलाकार नुकताच विवाहबद्ध झाला आहे. या कलाकाराचे नाव आहे तुषार घाडीगावकर. तुषार घाडीगावकर हा दिग्दर्शक तसेच सहकलाकार म्हणून नावारूपाला आला आहे. मराठी मालिका तसेच नाटकांमधून त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. एवढेच नव्हे तर बॉलिवूड क्षेत्रातही त्याने पाऊल टाकलेले पाहायला मिळाले आहे. २१ एप्रिल २०२२ रोजी तुषार घाडीगावकर हा त्याची खास मैत्रीण सिद्धी सोबत विवाहबद्ध झाला आहे.

actor tushar ghadigaonkar wedding
actor tushar ghadigaonkar wedding

लग्नसोहळ्याचे खास फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. घंटा नाद प्रॉडक्शन अंतर्गत तुषारने अनेक प्रोजक्टसाठी दिग्दर्शन केले आहे. आमचा मोरया रे, सारलेला क्षण, भाऊचा धक्का, माझ्या गजानना, बाप्पा, खत आया है या म्युजिक व्हिडीओ तसेच चित्रपटासाठी त्याने दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. मलाल या बॉलिवूड चित्रपटात तुषारने नायकाचा मित्र मुन्नाची भूमिका गाजवली होती. याशिवाय सूर राहू दे, हे मन बावरे, हनुमानजी आ रहे हैं त नाटक आणि मालिकेतून तो झळकला आहे. तुमची मुलगी काय करते या मालिकेत तो सध्या एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. तुषार घाडीगावकर याने डी जी रुपारेल कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच तुषारने राज्यनाट्य स्पर्धा, एकांकिकामधून अभिनय केला आहे. इथे त्याला अनेक कलाकारांची मोलाची साथ मिळत गेली. अभिनय करता करता तो हळूहळू दिग्दर्शन क्षेत्राकडे वळाला. हे मन बावरे मालिकेत त्याने साकारलेली टेण्याची भूमिका प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ठरली होती. छोट्या मोठ्या भूमिकांमुळे तुषार मराठी सृष्टीत स्थिरस्थावर झाला आहे. नुकतेच पार पडलेल्या त्याच्या लग्नसोहळ्याला मराठी कलाकारांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *