२२ मार्चपासून रात्री ११ वाजता झी मराठी वाहिनीवर रात्रीस खेळ चाले३ या नव्या मालिकेचे प्रक्षेपण केले जात आहे. मालिकेचे हे तिसरे पर्व असून त्याच्या पहिल्या तसेच दुसऱ्या पर्वालाही प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवलेली पाहायला मिळाली होती. नुकत्याच सुरू झालेल्या या तिसऱ्या पर्वाचे कथानक प्रेक्षकांना प्रचंड भावलेले पाहायला मिळत आहे. अण्णा नाईक आणि शेवंताच्या जाण्याने नाईकांचा वाडा अगदी विस्कळीत आणि पडझड झालेला दर्शवला आहे तर वाड्यात लहानाचे मोठे झालेले नाईक कुटुंब विखुरलेले पाहायला मिळत आहेत त्यात खास बाब म्हणजे या सर्वांची आस लागून राहिलेली माई शरीराने खचली असली तरी आपल्या विखुरलेल्या कुटुंबाला एकत्रित आणण्यासाठी धडपडताना दिसून आली.

कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आता माईवर आली असली तरी नाईकांच्या वाड्यावर अनेकांचा डोळा असलेला पाहायला मिळतो आहे. मालिकेतील अगोदरचे पात्र सध्या सक्रिय नसले तरी यात बरेच मोठे बदल केलेले दिसून येतात. लवकरच सुशमाच्या भूमिकेत आता तुला पाहते रे मालिकेतील अभिनेत्री झळकणार आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे “पूर्णिमा डे”. पूर्णिमा डे ने तुला पाहते रे मालिकेतून सोनियाची भूमिका साकारली होती. तिने साकारलेली सोनियाची ही भूमिका मालिकेत काहीशी विरोधी दर्शवली होती. हक भूमिका तिने तिथल्याच ताकदीने उभारल्याने तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. याच अनुषंगाने तिच्याकडे पुन्हा एकदा विरोधी भूमिका आलेली पाहायला मिळत आहे. रात्रीस खेळ चाले या पहिल्या पर्वाच्या मालिकेतून शेवंताची मुलगी सुषमाचे पात्र सर्वांना परिचयाचे झाले होते. मालिकेचे पहिले पर्व याच भूमिकेभोवती गुरफटलेले दिसून आले. त्यामुळे आता तिसऱ्या पर्वातही सुषमा पुन्हा एकदा सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे मात्र यावेळी ही भूमिका अभिनेत्री पूर्णिमा डे हिच्याकडे सुपूर्त करण्यात आली आहे. आजच्या भागात माईंच्या नावे असलेल्या नाईकांचा वाडा बळकवण्यासाठी सुषमा माईंवर जोर जबरदस्ती करताना दिसणार आहे. तत्क्षणी दाखल झालेला अभिराम तिचा हा डाव उधळून लावेल की आणखी काही वेगळे घडेल हे मालिकेच्या पुढील भागात अधिक स्पष्ट होईल पण त्याची उत्सुकताही प्रेक्षकांमध्ये आता निर्माण होत आहे. पूर्णिमा डे मालिकेव्यतिरिक्त गायन क्षेत्रातही झळकली आहे. सिंगिंग स्टार या शोमधून तिने पार्टीसिपेट केले होते याशिवाय ती एक ट्रेंड डाएटिशअन असून अनेकांना डाएट बद्दल मार्गदर्शन करते.