काही दिवसांपूर्वी अभिनेते मिलिंद दस्ताने मुंबईहून पुण्याला त्यांच्या कामानिमित्त आले होते. प्रवासादरम्यान एक तासासाठी ते लोणावळा येथे थांबले होते. परंतु या तासाभरात त्यांना जे नुकसान सोसावे लागले त्याबाबत त्यांनी नुकताच एक खुलासा केला आहे. मिलिंद दस्ताने यांनी तुझ्यात जीव रंगला मालिका साकारली आहे शिवाय काही मराठी चित्रपटातून देखील त्यांच्या वाट्याला दमदार भूमिका आल्या आहेत. त्यामुळे ते चित्रपट मालिका अभिनेते म्हणून परिचयाचे आहेत. मिलिंद दस्ताने काही दिवसांपूर्वी मुंबईहून पुण्याला येत होते. सुरुवातीला खालापूर टोल नाक्यावर त्यांच्या फास्ट टॅगच्या अकाउंटमधून २०३ रुपये इतका टोल वसूल केला गेला.

त्यानंतर पुढील प्रवासात तळेगाव जवळील टोलनाक्यावर त्यांच्या अकाउंट मधून ६७ रुपये कट झाले. पुण्याला पोहोचल्यावर ते ज्या कामानिमित्त गेले होते ते काम आटोपून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले. मुंबईहून पुण्याला जायला त्यांच्या फास्ट टॅगच्या अकाउंटमधून एकूण २७० रुपये आकारण्यात आले होते याबद्दल त्यांना काहीच प्रोब्लेम नव्हता. मात्र परतीच्या प्रवासावेळी त्यांना वेगळाच अनुभव आला. फास्ट टॅग अकाउंटमध्ये टोल साठी लागणारी रक्कम अगोदरच त्यांनी जमा केली होती. तळेगाव टोलनाक्यावर असताना त्यांच्या फास्ट टॅगच्या अकाउंटमधून २०३ रुपये रक्कम कट झाली. एक तासासाठी लोणावळा येथे विसाव्यासाठी ते थांबले . पुढे खालापूरच्या टोलनाक्यावर पोहोचताच त्यांच्या खात्यात पैसे कमी असल्याचे सांगण्यात आले आणि अधिकची रक्कम त्यांना द्यायला सांगितली. यावेळी माझ्याकडून त्यांनी १३५ रुपयांचा टोल आकारला असे दस्ताने म्हणतात. म्हणजे मुंबई पुणे ह्या त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांना टोलसाठी २७० रुपये द्यावे लागले होते. मात्र पुणे मुंबई हा प्रवास करताना त्यांना अधिकचे पैसे मोजवे लागले . तळेगाव टोल २०३ अधिक १३५ म्हणजे त्यांना ३३८ रुपये टोलसाठी द्यावे लागले. या अधिकच्या आकारणीबाबत त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. तर दहा दिवसांपूर्वी नियम बदलला असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजेच एक तास लोणावळ्याला थांबल्याने त्यांनी भरलेला अगोदरचा टोल रद्द करण्यात आला होता. केवळ एक तासासाठी लोणावळ्याला थांबणे दस्ताने यांना महागात पडले असल्याचे त्यांनी सांगितले. या अधिकच्या टोल आकारणीबाबत वेळच्यावेळी जाब विचारणे गरजेचे आहे. हे लोक सरळसरळ प्रवाशांची लूट करत आहेत हा अनुभव कित्येकांना आला आहे, त्यावर विचार होणे नक्कीच गरजेचे आहे.