सध्या मनोरंजन क्षेत्रामध्ये प्रत्येक कलाकार गूड न्यूज देण्यासाठी जणू आतूर झाला आहे . कुणी स्वप्नातलं घर खरेदी केले तर कुणाच्या घरी नवा इवलासा पाहुणा आलाय. तर काही अभिनेत्रींनी त्यांच्याकडे लवकरच पाळणा हलणार असल्याची बातमी सोशल मीडियावरून दिली आहे . तर अशा या गूड न्यूज च्या मांदियाळीत तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं असं ऑनस्क्रीन म्हणणारी अभिनेत्री अमृता पवार हिला रियल आयुष्यात जोडीदार मिळाला आहे. इंजिनिअर असलेल्या नील पाटील याला अमृताने लाईफ पार्टनर म्हणून निवडला असून नुकताच तिचा साखरपुडा देखील झाला आहे. हे खास फोटो अमृताने तिच्या इन्स्टा पेजवर शेअर केले.

आई बाबा आईची लाडकी लेक अशा त्रिकोणी कुटुंबातून 50 जणांच्या कुटुंबात लग्न होऊन आलेली आदि तीची भूमिका सध्या अमृता ,तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत साकारत आहे. सध्या एकत्र कुटुंब पद्धती हरवत चालली असताना ती टिकवून कशी ठेवता येईल हा संदेश घेऊन आलेली ही मालिका आदिती आणि सिद्धार्थ यांच्या वेगवेगळ्या कौटुंबिक विश्वावर आधारित आहे. या मालिकेत अमृताने आदितीची भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ऑनस्क्रीन संसाराची स्वप्न पहात आदर्श सून होण्याचा मान पटकावल्यानंतर खऱ्या आयुष्यात अमृताने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि निल पाटील याची निवड केली पाटील. नील हा अमृताच्या मनोरंजन क्षेत्रात काम करत नसला तरी त्याचा अमृताच्या अभिनयाला चांगला सपोर्ट असल्याचे ती सांगते. निलसोबत साखरपुड्याचे फोटो अमृताने शेअर केले असून साखरपुडामध्ये तिने नेसलेली जांभळ्या रंगाची साडी आणि पारंपरिक लुक मध्ये अमृता खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी तिला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत अमृताने साकारलेली जिजामातांची भूमिका आजही लक्षात राहते. ही मालिका करत असतानाच कोरोनाचे संकट आलं तरीदेखील सर्व नियमांची काळजी घेऊन शूटिंग सुरू असतानाच अमृताला कोरोनाची लागण झाली. कोरोनामुळे अनेक कलाकारांना आपल्या हातातील काम सोडावे लागले होते यामध्ये अमृता देखील होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे आपल्यापासून सेटवरच्या इतर लोकांना धोका पोहोचू नये यासाठी अमृताने तिच्या कारकिर्दीतील जिजामाता ही महत्त्वाची भूमिका सोडली. कोरोनातून बरी झाल्यानंतर आणि सगळं वातावरण निवळल्यानंतर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतून अमृता पवार पुन्हा तिच्या चाहत्यांना भेटली. या मालिकेत ती हार्दिक जोशी सोबत स्क्रिन शेअर करत आहे . अमृताच्या साखरपुड्याची बातमी ऐकल्यानंतर तिच्या ऑनस्क्रीन देशमुख कुटुंबियांनीही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे .