आजवर अनेक प्रसिद्ध मालिकांमधून ठराविक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांमध्ये बदल केलेले पाहायला मिळाले आहेत. लगिरं झालं जी या मालिकेत देखील जयडी आणि पुष्पा मामी यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना रिप्लेस केले होते. त्यामुळे काही कारणास्तव त्या विशिष्ट भूमिकेत नवखा कलाकार पाहायला तर प्रेक्षक त्या कलाकाराला लवकर स्वीकारत नाहीत. असेच काहीसे घडले आहे झी मराठीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत. या मालिकेत नुकताच एक ट्विस्ट आलेला पाहायला मिळतो आहे.

मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये मालिकेतील महत्वाची भूमिका साकारणारे कलाकार बदलण्यात आले आहे. त्यामुळे त्या कलाकाराने मालिका सोडली असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रोमोमधला हा ट्विस्ट प्रेक्षकांना आश्चर्य चकित करणारा ठरला आहे. मालिकेत गेल्या काही दिवसांपासून सिद्धू अदितीला परदेशात नेण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करताना दिसला. अदितीने त्याचा हा सर्व खटाटोप त्याची आई म्हणजेच मोठीबाईला सांगितला होता. मात्र अदितीच्या या खुलास्यावर मोठीबाई बेशुद्ध होऊन पडल्या होत्या. त्यानंतर त्यांचे पात्र काही काळापुरते मालिकेत न दाखवण्याचा प्रयत्न केला. या कालावधीत मोठी बाईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ‘ अंजली जोशी’ यांनी मालिका सोडणार असल्याने त्यांच्या जागी नव्या कलाकाराचा शोध सुरू झाला. अंजली जोशी या प्राध्यापिका आहेत त्यामुळे त्यांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असावा असे बोलले जात आहे. अंजली जोशी यांनी निभावलेली मोठीबाई ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यांच्या जागी आता नव्या अभिनेत्रीची वर्णी लागलेली पाहायला मिळत आहे.

अदिती सगळ्यांसमोर एवढी कठोर का वागत आहे हे मोठीबाई सगळ्यांना सांगणार आहे रविवारी या मालिकेचा एक तासाचा विशेष भाग प्रसारित होत आहे या विशेष भागात प्रेक्षकांना हा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यात मोठी बाईंचे पात्र नवख्या अभिनेत्री साकारताना दिसणार आहेत. मालिकेत केलेला हा बदल प्रेक्षक स्वीकारतील की नाही हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल मात्र मालिकेतील या बदलामुळे प्रेक्षकांनी थोडीशी नाराजी व्यक्त केली आहे. प्रेक्षकांची झालेली नाराजी ही भुमीका साकारणाऱ्या अभिनेत्रीसमोर हे मोठे आव्हान आहे. येत्या काही दिवसातच त्या ही भूमिका कशी निभावतात याचा उलगडा होईल. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिका सुरवातीपासूनच प्रेक्षकांच्या आवडीची मालिका ठरली आहे एक पारिवारिक मालिका ज्यात संपूर्ण कुटुंब एकमेकांना धरून पुढे जात आहे हे पाहायला देखील प्रेक्षकांना आवडलेलं पाहायला मिळत आहे.