
मालिकेची उत्सुकता सतत टिकून ठेवण्यासाठी क्रिएटीव टीम वेगवेगळे प्रयोग करत असते. मग कधी मालिकेतील हुकमी एक्का असलेला कलाकार गायब झालेला दाखवतात तर कधी मालिकेच्या ट्रॅकमध्ये नव्या कलाकाराची एन्ट्री केली जाते. हा ट्रेंड आपण नेहमीच वेगवेगळ्या मालिकांमध्ये पाहतो. सध्या प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती अभिनेत्री वीणा जगताप हिच्या एंट्रीची. टीव्हीवर सध्या गाजत असलेल्या ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ‘या मालिकेत वीणा जगताप बिझनेसवुमनच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. रेवा नावाचं पात्र ती या मालिकेत साकारणार आहे.

बर्याच दिवसांनी वीणा जगताप पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार असल्याने तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. अनेक अडचणी पार करत या मालिकेचा नायक सिद्धार्थ आणि नायिका आदिती यांनी एकमेकांशी लग्न केलं. पण सध्या मतभेदांमुळे या दोघांमध्ये दुरावा आला आहे. अशातच वीणा जगतापच्या रूपाने रेवा या व्यक्तिरेखेची मालिकेत होणारी एन्ट्री खूप काही घडामोडी घडवून आणेल असं या मालिकेच्या प्रोमो मधूनच प्रेक्षकांना कळाले आहे. वीणाने तिच्या सोशल मीडिया पेजवर बिझनेस वुमन रेवाचा लूक शेअर करत ही बातमी दिली आहे .तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत गेल्या काही दिवसात नवे कलाकार येत आहेत तर काही कलाकारांनी या मालिकेला निरोप दिल्याने त्यांच्या जागी नव्या कलाकारांची वर्णी लागली आहे. अशातच वीणा जगताप या अभिनेत्रीची एन्ट्री हा सध्या या मालिकेच्या निमित्ताने चर्चेचा विषय ठरला आहे. राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतून वीणाने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.

सचित पाटील याच्या सोबत तिने या मालिकेत स्क्रिन शेअर केली होती . त्यानंतर वीणा खरी चर्चेत आली ती बिग बॉसच्या सीझन टू ची स्पर्धक म्हणून. याच शो मध्ये अभिनेता आणि डान्सर शिव ठाकरे याच्यासोबत जमलेल्या तिच्या रिलेशनशिपवरून वीणा प्रसिद्धीच्या झोतात आली . शिव आणि वीणा ही जोडी मनोरंजन क्षेत्रात नेहमीच काही ना काही चर्चा घडवून आणत राहिली . मात्र सध्या या दोघांचा ब्रेकअप झाला आहे . त्यानंतर वीणा ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडची रिप्लेसमेंट म्हणून दिसली . परंतु तब्येतीच्या कारणामुळे तिने या मालिकेला काही महिन्यातच रामराम ठोकला .आता ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेतून ती दमदार एन्ट्री करण्यास तयार झाली आहे .