स्टार प्रवाह वाहिनीवर २ मे २०२२ पासून रात्री ९ वाजता ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेतून उर्मिला कोठारे आणि अभिजित खांडकेकर मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. हे दोघेही स्वराच्या आई वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. मात्र गाणं आणि संसार या दोन्ही गोष्टींपैकी एक गोष्ट निवडायची म्हणून स्वराच्या बाबांनी म्हणजेच मल्हार कामतने गाणे निवडले आणि तो आपल्या कुटुंबाला सोडून शहरात गेला. गाण्यामुळे मल्हार आपल्याला सोडून त्यामुळे स्वराने गाणं सोडावं अशी तिच्या आईची ईच्छा असते.

मालिकेत स्वराची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे अवनी तायवडे या बालकलाकाराने. याअगोदर अवनी तायवडे हीने हिंदी मालिका बालकलाकार म्हणून लोकप्रियता मिळवली आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून अवनी प्रथमच मराठी मालिका सृष्टीत पाऊल टाकत आहे. अवनी तायवडे सोबतच या मालिकेत आणखी एक बालकलाकार झळकणार आहे. ही बालकलाकार मराठी सृष्टीतील एका प्रसिद्ध कलाकाराची मुलगी देखील आहे. या बालकलाकाराचे देखील नाव आहे अवनीच असून ती प्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी यांची कन्या आहे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या शोमधून सिद्धार्थ चांदेकर आणि अवनी जोशी यांनी सूत्रसंचालन केले होते. या शोमध्ये दोघांचे ट्युनिंग खूपच छान जुळून आले होते. एवढ्या कमी वयात अवनीचाही हजरजबाबीपणा प्रेक्षकांना विशेष भावलेला पाहायला मिळाला होता. शालेय अभ्यासासोबतच अवनीने स्टार प्रवाहवरील साथ दे तू मला या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. अवनीला गायनाची देखील आवड आहे हे उपजत गुण तिला तिच्या आईवडीलांकडूनच मिळाले असे म्हणायला हरकत नाही.

कारण अवनीचे आई वडील म्हणजेच अनिरुद्ध जोशी आणि रसिका जोशी हे दोघेही गायक आहेत. अनिरुद्ध जोशी यांनी अनेक मंचावरून गाण्याचे सादरीकरण केले आहे झी टीव्हीवरील आयडिया सारेगमप या शोचा विजेता तसेच सूर नवा ध्यास नवा ह्या शोचा ते विजेता ठरले होते. आजवर वेगवेगळ्या म्युजिक अल्बम मधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहेत. अवनी देखील एक बालकलाकार म्हणून आता स्वतःची ओळख निर्माण करताना दिसत आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत ती कोणती भूमिका साकारणार हे येत्या काही दिवसातच समजेल तूर्तास या नवीन मालिकेसाठी आणि नवीन भूमिकेसाठी अवनी जोशी हिचे अभिनंदन!