
मालिकेत प्रमुख भूमिकांप्रमाणे सहाय्यक भूमिका साकारणारे कलाकार देखील तेवढेच महत्वाचे मानले जातात. नायकाचा मित्र अथवा नायिकेची मैत्रीण, आज्जी, काका काकू सारख्या सहाय्यक व्यक्तिरेखांमुळे मालिकेला अधिक रंग चढत जातो. झी मराठीवरील तू तेव्हा तशी या मालिकेला देखील नीलच्या भूमिकेमुळे असाच रंग चढलेला पाहायला मिळतो आहे. अनामिका आणि सौरभ या प्रमुख पात्रासोबत नील आणि राधाची खुलून आलेली प्रेमकहाणी प्रेक्षकांना देखील हवीहवीशी वाटावी अशीच आहे. मात्र निलच्या खऱ्या आयुष्यातली राधा नुकतीच समोर आली आहे. सोशल मीडिया अकाउंटवर त्याने फोटो शेअर केला आहे.

तू तेव्हा तशी मालिकेत स्वानंद केतकर याने नीलची भूमिका साकारली आहे. या भूमिकेमुळे स्वानंद प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला आहे. स्वानंद केतकर हा मुंबईतच लहानाचा मोठा झाला. रामणारायन रुईया कॉलेजमध्ये असताना त्याने अनेक राज्यनाट्य स्पर्धा तसेच एकांकिका मधून सहभाग दर्शवला होता. यात त्याला उत्कृष्ट अभिनयाची बक्षिसं देखील मिळाली आहेत. वैदेही या मालिकेनंतर स्वानंदला तू तेव्हा तशी मालिकेत झळकण्याची नामी संधी मिळाली आहे. नीलच्या भूमिकेमुळे स्वानंदला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. ‘आपली सोसल वाहिनी’ या सेगमेंटमधून अनेक मजेशीर व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. याचे दिग्दर्शन आणि लेखन स्वतः समीर खांडेकर याने केले आहे. यातील काही व्हिडिओत स्वानंद केतकर देखील झळकला होता. स्वानंदने नुकतेच आपल्या खास मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे. या शुभेच्छा देताना त्याने या मैत्रिणीसोबतचा एक फोटो देखील शेअर केलेला पाहायला मिळतो आहे. या फोटोवरून त्यांच्या जवळच्या मित्रांनी खास कमेंट्स केलेल्या आहेत त्यावरून हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

त्यामुळे निलच्या खऱ्या आयुष्यातील राधा अशी चर्चा या फोटोवरून रंगलेली पाहायला मिळत आहे. स्वानंदच्या या खास मैत्रिणीचे नाव आहे अक्षता आपटे. अक्षता आणि स्वानंद दोघेही रूईया कॉलेजमधून एकत्रित आले. गेल्या सहा ते सात वर्षांपासून हे दोघे एकमेकांना खूप चांगले ओळखतात. अक्षतासुद्धा थिएटर आर्टिस्ट आहे. कलादिंडी या नाटिकेत ती रखुमाईच्या भूमिकेत झळकली होती. या दोघांनी मिळून कलाश्रय संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेतून गायन स्पर्धा, म्युजिक वर्कशॉप, वारली आर्ट वर्कशॉप सारखे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. स्वानंद आणि अक्षताचे एकत्रित फोटो पाहून त्यांच्या मित्राने ‘सारी दुनिया की बर्फ पिघल गई’ अशी एक सूचक कमेंट केली आहे. त्यावरून स्वानंद अक्षताच्या प्रेमात आहे असे स्पष्ट दिसत आहे.