“तू चाल पुढं” हि झी मराठी वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अनेक वर्षानंतर अभिनेता अंकुश चौधरी ह्याची पत्नी दीपा परब हिने पुन्हा छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली. मालिकेतील सर्वच कलाकार उत्तम अभिनय करताना पाहायला मिळतात. दीपा परब चौधरी सोबत अभिनेता आदित्य वैद्य ह्याने प्रमुख भूमिका साकारली आहे. मालिकेत दीपा परब चौधरी, आदित्य वैद्य, वैष्णवी कल्याणकर, धनश्री काडगावकर, देवेंद्र दोडके या कलाकारांनी उत्तम अभिनय केलेला पाहायला मिळतो. एका सामान्य कुटुंबातील परिवाराला जीवन जगताना येणाऱ्या अडचणींना सामोरे जाताना घरातील महिलेने घराला सावरण्याचा प्रयत्न करत घर पुन्हा उभारण्यासाठी केलेली धडपड ह्या मालिकेत दाखवली आहे. मालिकेतील गृहिणी घराला आधार देण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये काम करताना दाखवली आहे. तर घरातील बाबा बिल्डिंगमध्ये पहारेकऱ्याच काम करत आपला हातभार लावत आहेत.

आपल्या पतीचा बिजनेस बुडाला म्हणून गृहिणी काम करून घर सांभाळते. आणखीन जास्त काम व्हावं आणि घरात आणखीन पैसा यावा ह्यासाठी ती एक टुव्हीलर देखील खरेदी करते. पण तीच गाडी तिचाच पती चोरून ती विकून बाबांना पैसे आणून देतो. जेंव्हा ती गाडी आपलाच पती चोरतो हे जेंव्हा गृहिणी म्हणजेच अश्विनीला समजते तेंव्हा तिला मोठा धक्का बसतो. बाबा आपल्या मुलाला काम करून पैसे कमवायला सांगतात पण मुलगा आता वेगळ्या वळणाला लागलेला पाहायला मिळतो. मालिकेतील बाबांची भूमिका अभिनेते देवेंद्र दोडके यांनी साकारली आहे. आपल्या मुलाला व्यवसायात मदत व्हावी याकरता त्यांनी आपल्या गावची जमीन देखील विकली. त्यामुळेच आज त्यांना बिल्डिंगमध्ये पहारेकऱ्याच काम करावं लागत आहे. अभिनेते देवेंद्र दोडके यांना तुम्ही यापूर्वी देखील अनेक मालिका आणि चित्रपटांत भूमिका करताना पाहिलं असेलच. झी वाहिनीच्या “माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेत त्यांनी गुरूच्या बाबांची भूमिका साकारली होती. त्यांची हि भूमिका देखील त्याच भूमिकेशी मिळती जुळती असलेली पाहायला मिळत आहे. आपल्या मुलाच्या पत्नीला तिच्या बिजनेसाठी मदत करताना ह्याही मालिकेत दाखवलं आहे. धनगरवाडा, गजब हेराफेरी, घाम, आम्ही कारभारणी, जय साई राम, तानी अश्या अनेक चित्रपटांत त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

अभिनेते देवेंद्र दोडके हे एक उत्तम अभिनेते आहेतच पण त्यांची पत्नी देखील अभिनेत्री आहेत हे अनेकांना माहित नसेल. अभिनेते देवेंद्र दोडके यांच्या पत्नीचं नाव “दीपाली देवेंद्र दोडके” असं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री दीपाली दोडके अभिनय साकारताना पाहायला मिळाल्या. पण काही वर्षांपासून त्या अभिनयापासून दूर गेलेल्या पाहायला मिळत आहेत. शिर्डी साई या चित्रपटात अभिनेते देवेंद्र दोडके यांच्या सोबत त्यांच्या पत्नीने देखील भूमिका साकारली आहे. अभिनेते देवेंद्र दोडके यांनी शिर्डी साई या चित्रपटात श्याम देशमुखची भूमिका साकारली होती तर त्यांची पत्नी दीपाली दोडके यांनी राधाबाई देशमुख यांची भूमिका साकारली. साऊथचा अभिनेता नागार्जुन यांनी या चित्रपटात साईंची भूमिका केली होती. हा चित्रपट हैद्राबाद येथे शूट झाला होता.या चित्रपटानंतर देखील त्यांनी काही नाटकात कामे केली होती. पण गेल्या काही वर्षांपासून त्या अभिनय क्षेत्रापासून दूर गेलेल्या पाहायला मिळतात.