news

‘टोरेस’ कंपनीचा मोठा घोटाळा …हजारो गुंतवणूकदारांचे करोडो रुपये बुडवून मालक झाला फरार

काल सकाळपासूनच दादरमधील टोरेस कंपनीला टाळं लागलेलं गुंतवणूक दारांना समजलं. तेव्हापासून या ऑफिसच्या बाहेर लोकांची गर्दी जमलेली पाहायला मिळत आहे. टोरेस कंपनीकडून गुंतवणूकदारांना ८ ते १० टक्के व्याज दिलं जाणार होतं. अनेक गुंतवणूकदारांनी २० हजार, ३ लाख, ५ लाख ते १० लाख असे जवळचे पैसे या कंपनीत गुंतवले होते. या रकमेवर जसे ठरेल तसे ८ ते १०% व्याज देण्यात येईल असे कंपनीकडून सांगितले जात होते. गेल्या काही दिवसांत या आमिषाला भुलून अनेक लोकांनी जमेल तशी गुंतवणूक केली होती. अगदी आदल्या दिवशीही काही तरुणांनी ७० हजार रुपये गुंतवल्याचे सांगण्यात आले. मात्र काल मंगळवारी सकाळीच या ऑफिसला टाळं लागलेलं समोर आलं.

अश्या प्रकारे साखळी बनवून आणखीन लोकांना अमिश दाखवून हा घोटाळा केला गेला…

फक्त दादर मधीलच नाही तर अन्य ठिकाणी असलेले टोरेस कंपनीचे सगळे ऑफिसेस बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक करून पालायन केलं असल्याचं आता उघडकीस आलं आहे. ८ ते १० % मिळणाऱ्या परताव्याची अपेक्षा ठेऊन बसलेले हे गुंतवणूकदार आता कोणाकडे दाद मागू अशा परिस्थितीत आहेत. एका महिलेने तिचं मंगळसूत्र विकून तब्बल ५ लाख रुपये या कंपनीमध्ये गुंतवले होते. आज हप्ता मिळणार म्हणून महिलेने सकाळीच टोरेस कंपनीची वाट धरली होती. पण बंद ऑफिस बघून ‘आता काय करावं?’ हा प्रश्न तिच्यापुढे उभा राहिलेला आहे. कंपनीकडून अनेकजणांना मंगळवारी पहिला हप्ता दिला जाणार होता.

ज्या लोकांनी जास्त कस्टमर केले त्यांना चक्क कार मोबाईल देखील केले होते गिफ्ट…

मात्र ही बातमी पाहताच गुंतवणूकदारांनी ऑफिसबाहेर एकच गर्दी केली. या घटनेनंतर हे गुंतवणूकदार कंपनी विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगताना दिसले. यागोदरही अशा अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. अनेक गुंतवणूकदार जास्तीचा परतावा मिळावा म्हणून अशा अमिषाला बळी पडतात. कष्टाने जमलेले पैसे योग्य त्या ठिकाणी गुंतवावे असे सल्ले देऊनही हे लोक खाजगी कंपन्यांवर भरवसा ठेवतात. यामध्ये वृद्ध व्यक्तीच नाही तर अनेक तरुणही अडकलेले पाहायला मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button