चिंटू चित्रपटातली नेहा आता दिसते खूपच सुंदर मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध कलाकाराची आहे मुलगी

श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित “चिंटू” हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता त्यानंतर २०१३ साली चिंटू 2 हा आणखी एक चित्रपट त्यानी प्रेक्षकांच्या भेटीला आणला. हे दोन्ही चित्रपट लहानग्या प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाले होते. चिंटू आणि त्यांच्या मित्राच्या करामती या दोन्ही चित्रपटात आपल्याला अनुभवायला मिळाल्या होत्या. या दोन्ही चित्रपटात नेहाची भूमिका साकारली होती बालकलाकार “रुमानी खरे” हिने. आज या दोन्ही चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास ९ आणि १० वर्षे झाली आहेत त्यातील ही नेहा आता बरीच मोठी झाली असून मधल्या काळात तिने कथ्थक नृत्याचे धडे देखील गिरवले आहेत.

रुमानी खरे हीने अभिनव विद्यालय तसेच एस पी कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. अभिनयासोबतच कथ्थक नृत्याची देखील तिला विशेष आवड आहे. २०१२ सालच्या “चिंटू” या मराठी चित्रपटातून तीने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यापाठोपाठ चिंटू 2 हा आणखी एक चित्रपट तिने बालकलाकार म्हणून साकारला. मधल्या काळात बालभारतीने एक डॉक्युड्रामा साकारला होता त्यात रुमानीला देखील झळकण्याची संधी मिळाली होती. बालभारतीचा प्रेरक इतिहास आणि संस्थेने आजवर केलेली प्रगती नव्या पिढीला समजावी म्हणून हा डॉक्युड्रामा बनवण्यात आला होता. २०१९ साली “आई पण बाबा पण” हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं यात रुमानी खरे महत्वाच्या भूमिकेत झळकली होती. तर कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांतून तिने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.

तुम्हाला जाणून कौतुक वाटेल की रुमानी खरे ही बालकलाकार प्रसिद्ध कवी, गायक “संदीप खरे” यांची मुलगी आहे. आयुष्यावर बोलू काही हा त्यांचा गीतांचा संग्रह विशेष प्रसिद्ध आहे. संदीप खरे आणि सलील कुलकर्णी या जोडीने एकत्रित पणे अनेक मंचावरून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अग्गोबाई ढग्गोबाई, कधी हे कधी ते, तुझ्यावरच्या कविता, आरसपानी हे त्यांचे कविता संग्रह आहेत. आयुष्यावर बोलू काही हा त्यांचा कार्यक्रम खूपच लोकप्रिय झाला होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. वैभव जोशी सोबत ‘इर्शाद’ हा कार्यक्रम तसेच ‘आतला कप्पा’ हा त्यांचा कार्यक्रम त्यांनी प्रेक्षकांचया भेटीला आणला आहे. संदीप खरे ४ थ्या इयत्तेत असल्यापासूनच कविता बनवायचे आणि आज त्यांच्या कार्यक्रमाला हाऊसफुलचे बोर्ड लागलेले पाहायला मिळतात हे विशेष.

संदीप खरे यांच्या पत्नीचे नाव सोनिया खरे. सोनिया नेहमीच आपल्या लेकीला म्हणजेच रुमानीला प्रोत्साहन देत असते. तिला ज्या क्षेत्राची आवड आहे त्यात तिने आपले करिअर करावे असे ती म्हणते. रुमानीने सध्या आपले शिक्षण पूर्ण केले आहे आणि ती दिसायलाही अतिशय सुंदर आहे. रुमानी इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह असून आपल्या नृत्याची आवड ती नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. भविष्यात ती कुठल्या चित्रपट किंवा मालिकेतून मुख्य नायिका बनून प्रेक्षकांच्या भेटीला आल्यास वावगे ठरायला नको…