जरा हटके

आधी वळायचा शेळ्या मेंढ्या आता करतो हा व्यवसाय आणि झाली भरभराट

“टिंग्या” या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज जवळपास १३ वर्षे लोटली आहेत परंतु आजही या चित्रपटातील हा बालकलाकार प्रेक्षकांच्या तितक्याच स्मरणात राहीला आहे. विशेष म्हणजे चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे त्याला आजही टिंग्या याच नावाने ओळखले जाते. आजारी असलेला बैल चितंग्या आणि टिंग्या यांच्यामधील नाते या चित्रपटात अतिशय सुरेख दर्शवण्यात आलेले पाहायला मिळाले होते. चितंग्याला वाचण्यासाठी त्याने केलेली धडपड चित्रपटात दर्शवण्यात आली होती. या भूमिकेची दखल घेत राष्ट्रीय पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले होते.

actor sharad goyekar with family
actor sharad goyekar with family

आलेल्या संकटांना तोंड देत एक शेतकरी कसे जीवन व्यतीत करतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे टिंग्या हा चित्रपट होय. मंगेश हाडवळे यांनी या चित्रपटाचे दिगदर्शन केले होते. टिंग्याची भूमिका ‘शरद गोएकर’ या बालकलाकाराने साकारली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. चित्रपटाच्या यशानंतर देखील कला क्षेत्रापासून उपेक्षित राहिल्यामुळे शरद व त्याच्या कुटुंबियांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले होते. शेळ्या मेंढ्याच्या व्यवसायामुळे त्याला आपल्या कुटुंबासोबत गावोगावी भटकंती करावी लागत होती. यानंतर राज ठाकरे यांनी त्याला बंगला बांधून दिला आणि त्याच्या राहण्याची व्यवस्था करून दिली. पुढे सिंहगड पब्लिक स्कुल मधून त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. तर पुढील शिक्षण त्याने पुणे युनिव्हर्सिटी येथून पूर्ण केले. ‘सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी’ मधून त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्याचा मोठा भाऊ भरत गोएकर हा देखील भिवंडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी कार्यरत आहे.

actor sharad goyekar
actor sharad goyekar

शिक्षणाच्या बळावर शरदने आता Inox नावाने किचन ट्रॉलीज बनविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. किचन ट्रॉलीजच्या व्यवसायामुळे त्याची चांगलीच भरभराट झाली आहे. आपल्यासोबत इतर लोकांना देखील त्याने रोजगार मिळवून दिल्यान त्याला समाधान मिळत आहे. “ब्रह्मवाणी वाग्देवाची आणि माझ्या प्रेमा” या चित्रपटात त्याने महत्वाच्या भूमिकाही साकारल्या आहेत. एवढेच नाही तर तो आता दिग्दर्शन क्षेत्रातही आपले नशीब आजमाऊ पाहत आहे. सध्या व्यवसाय क्षेत्रात स्थिरावलेल्या शरदने “बब्या” या नावाने चित्रपट बनवण्याचे ठरवले. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असले तरी हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होईल हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. याशिवाय लागीरं झालं जी मालिकेतील आज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण याला घेऊन शरदने आपल्या आगामी चित्रपटाचे काम सुरू केले आहे. गेल्या वर्षी ह्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले होते. टिंग्याला उर्फ शरद गोएकरला त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button