रवी जाधव दिग्दर्शित टाईमपास ३ चित्रपट शुक्रवारी २९ जुलै रोजी प्रदर्शित झाला. अवघ्या चार दिवसात पालवी आणि दगडूच्या प्रेमकहाणीला चित्रपट गृहात प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिलेला पाहायला मिळतो आहे. डॅशिंग पालवी आणि साधाभोळा दगडू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने शनिवारी आणि रविवारी या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर छप्परफाड गल्ला जमवला आहे. सोबतच पालवीच्या फफ्फाची जादुही चित्रपटगृहात हास्याचे फवारे उडवताना दिसले आहेत. हृता दुर्गुळेचे चाहते खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. एक्सप्रेशन क्वीन म्हणूनही तिला ओळखले जाते त्यामुळे तिचा चित्रपट पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक होते. अनन्या हा तिने अभिनित केलेला पहिला चित्रपट या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून हृताच्या अभिनयाचे सगळ्यांनी कौतुक केले होते.

पुढच्याच आठवड्यात तिचा दुसरा चित्रपट रिलीज झाला त्यामुळे हृताचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. टाईमपास , टाईमपास २ या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. टाईमपास ३ चित्रपटात दगडूचे कॅरॅक्टर प्राथमेश परबने पुन्हा एकदा गाजवलेलं पाहायला मिळालं. भाऊ कदम, संजय नार्वेकर, वैभव मांगले, आरती वडगबाळकर यांनीही आपापल्या भूमिका अगदी चोख बजावल्या आहेत. प्रेक्षकाला एका जागेवर खिळवून ठेवण्यासाठी या कलाकारांचाही तेवढाच मोठा वाटा आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी या चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर ८० लाखांचा गल्ला जमवला. तर शनिवारी प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद देत १.१८ कोटींचा गल्ला जमवण्यात भर टाकली. रविवार हा आकडा वाढत जाऊन १.७३ कोटींपर्यंत मजल मारलेली पाहायला मिळाली. तर सोमवारी या चित्रपटाने जवळपास ६३ लाखांची कमाई केली. त्यामुळे अवघ्या ४ दिवसात टाईमपास ३ चित्रपटाने ४.३६ कोटींचा गल्ला जमवलेला आहे. येत्या काही दिवसात हा आकडा निश्चितच वाढणार याची खात्री आहे.

निर्मिती टीमला हा चित्रपट बनवण्यासाठी ६ कोटींचा खर्च आला. चित्रपटाच्या जाहिरात आणि प्रमोशन साठी जवळपास १ कोटींचा खर्च करण्यात आला असल्याचे बोलले जाते. त्यामुळे एकूण ७ कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट पहिल्या आठवड्यातच आपला झालेला खर्च भरून काढेल याची खात्री वाटते. दरम्यान चित्रपटातील गाणी देखील सोशल मीडियावर चांगलीच हिट झाली आहेत. या चित्रपटाची जादू बॉलिवूड चित्रपटांना देखील भारी पडणार असेच चित्र या पहिल्या चार दिवसांच्या कमाईवरून तरी पाहायला मिळत आहे. सध्या कोणताही हिंदी किंवा साऊथचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही ह्याचा फायदा रवी जाधवांच्या टाईमपास चित्रपटाला देखील झालेला पाहायला मिळतो. दगडू साकारणाऱ्या प्रथमेशचे डायलॉग तर हटकेच आहेत शिवाय अभिनेत्री हृता देखील प्रसिद्धीच्या झोतात आहे हेच ह्या चित्रपटाच्या यशा मगच खरं कारण मानलं जातंय.