जरा हटके

ती परत आलीये मालिकेतील अभिनेता होणार बाबा फोटो शेअर करून दिली आनंदाची बातमी

नव्या वर्षाच्या सुरुवातीला अनेक मराठी सेलिब्रिटी विवाहबद्ध होत आहेत तर काहींच्या घरी चिमुकल्या पावलांची चाहूल लागलेली पाहायला मिळते आहे. काहे दिया परदेस या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्धीस आलेला अभिनेता समीर खांडेकर लवकरच बाबा होणार असल्याचे सांगतो आहे. ‘लवकरच रंगभूमीवर’ असे गोड कॅप्शन देऊन समीरने त्याच्या पत्नीसोबत बेबीशॉवरचे फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्याच्या या गोड बातमीवर सहकलाकारांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

actor sameer khandekar family
actor sameer khandekar family

काहे दिया परदेस या मालिकेतून समीर खांडेकरने वेणूगोपालची दाक्षिणात्य भाषेचा बाज असलेली भूमिका त्याच्या अभिनयाने सुरेख रंगवली होती. मालिकेतून वेणूचे पात्र धमाल मजामस्ती करणारे होते त्यामुळे ही भूमिका उठावदार ठरली होती. वैजू नं १ या स्टार प्रवाहवरील मालिकेत समीर मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला होता. तारक मेहता का उलटा चष्मा या लोकप्रिय हिंदी मालिकेतूनही तो एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला.शिवाजी कॉलेज तसेच भवन्स कॉलेजमधून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले होते. अभिनयाची आवड असल्याने नाटक, मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. बहुतेक मालिकेतून त्याच्या वाट्याला विनोदी भूमिकाच आलेल्या पाहायला मिळाल्या. झी मराठीवरील नुकतीच एक्झिट घेतलेली ती परत आलीये या मालिकेतून तो हनम्या ( हणमंत) च्या भूमिकेत दिसला. ही मालिका भयपटावर आधारित असली तरी हनम्याचा मिश्किल स्वभाव या मालिकेतून दाखवण्यात आला होता.

actor sameer khandekar with wife
actor sameer khandekar with wife

डिसेंबर २०१५ साली समीर खांडेकर आणि वैभवी राणे खांडेकर यांचा विवाह झाला होता. वैभवी राणे खांडेकर हिने पाटकर वर्दे कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. ‘आपली सोसल वाहिनी’ या सेगमेंट मधून अनेक मजेशीर व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. याचे दिग्दर्शन आणि लेखन स्वतः समीर खांडेकर याने केले असून त्याची पत्नी वैभविने निर्माती म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. आजवर या व्हिडिओजना प्रेक्षकांकडूनही खूप चांगला असा प्रतिसाद मिळाला आहे. समीर खांडेकर,शशांक केतकर, ऋतुजा बागवे, मिहीर राजदा, पल्लवी पाटील असे बरेचसे कलाकार या नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून झळकले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button