मराठी मालिका आणि चित्रपट सृष्टीतील अभिनेत्रींच्या बाबतीत आनंदाची बातमी समोर येतीय.. एक दोन नाही तर ३ मराठी अभिनेत्री लवकरच आई बनणार आहेत. तिघींनी त्यांच्या डोहाळे जेवणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. मराठी मालिका अभिनेत्री “दिपश्री माळी” हिने नुकत्याच पार पडलेल्या आपल्या डोहळजेवणाचे फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर सुयश टिळकसह अनेक सहकलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. साधारण चार वर्षांपूर्वी दिपश्रीने अमेय माळीसोबत लग्न केले होते.

दिपश्री माळी ही मराठी चित्रपट आणि मालिका अभिनेत्री असून ‘एक घर मंतरलेलं’, ‘गर्ल्स हॉस्टेल’ अश्या मालिकेतून ती पाहायला मिळाली होती. तिच्या सोबतच अभिनेत्री उर्मिला निंबाळकर लवकरच आई होणार आहे. तिचे फोटो ती नेहमी सोशिअल मीडियावर शेअर करते त्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करताना ट्रोल होत होती. ‘आमचं बाळ काय ढगातून पडलंय का?’ ‘एवढं काय हिचं प्रेगन्सीचं कौतुक’? असे अनेक वाद आणि त्यावर तिने दिलेली उत्तरे यांची चांगलीच चर्चा रंगली होती. अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने संगीत सम्राट या रियालिटी शोचे रोहित राऊत सोबत सूत्रसंचालन केले होते. दिया और बाती हम, मेरी आशिकी तुम से ही, एक तारा, दुहेरी अशा मालिका आणि चित्रपटातून अभिनय साकारला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेकनोलॉजीची पदवी तिने प्राप्त केली आहे. ९ फेब्रुवारी २०१३ रोजी उर्मिलाने सुकीर्त गुमस्ते यांच्यासोबत लग्न केले. उर्मिला नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवरून व्हिडीओजच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. शॉपिंग कशी करावी, साडी कशी नसावी, कपडे कोणते घालावे या फॅशन सेन्सबाबत ती नेहमीच संवाद साधताना दिसायची. सध्या उर्मिला प्रेग्नन्ट आहे आणि काहीच दिवसात ती आई देखील होणार आहे.

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने नुकताच आपल्या डोहाळे जेवणाचा एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ढेपे वाडा येथील आपल्या कुटुंबासोबत तिने हा आनंदाचा सोहळा उपभोगला आहे. अगदी सुंदर फुलांनी मढलेल्या आणि सुंदर साडीमध्ये ती खूपच खुलून दिसत होती. हा आनंदाचा प्रत्येक क्षण तिने आपल्या परिवाराच्या उपस्थितीत साजरा केल्याने आनंद द्विगुणित झाल्याचं ती सांगते. ह्या दोघींसोबतच आता आणखीन एक अभिनेत्रीने देखील आपले फोटो नुकतेच शेअर केले आहेत त्या अभिनेत्रीच नाव आहे “स्मिता तांबे”. स्मिता तांबे हिने अप्सरा आली, बोल बच्चन, फू बाई फू, अनुबंध, सोनियाचा उंबरा, लाडाची मी लेक गं! अश्या अनेक मालिकेत महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. स्मिताने वीरेंद्र द्विवेदी सोबत २०१९ साली लग्नगाठ बांधली होती. नुकताच तिने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यात अभिनेत्री आदिती सारंगधर, रेशम टिपणीस, अमृता संत, फुलवा खामकर ह्यांच्यासोबत हिने ह्या सोहळ्याचा आनंद लुटला आहे.
