
ठिपक्यांची रांगोळी ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केली जात आहे मालिकेतील जाणत्या कलाकारांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेत अभिनेता चेतन वडनेरे शशांक हे मुख्य पात्र साकारत आहे. तर अपूर्वाची भूमिका ज्ञानदा रामतीर्थकर निभावत आहे. शशांक बेशिस्त आणि उर्मट असलेल्या अपूर्वासोबत लग्न करणार का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरत आहे. दरम्यान मालिकेत शशांकची भूमिका साकारणारा अभिनेता चेतन वडनेरे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत येत आहे. त्याच कारण देखील तसंच आहे.

चेतन वडनेरे याने अभिनेत्री ऋजुता धारप हिच्यासोबत एक फोटो शेअर करत आहे या फोटोवरून यो अभिनेत्री ऋजुता धारप हिला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी लेहलडाखची ट्रिप एकत्रित एन्जॉय केली त्यावरून हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत असे त्याच्या चाहत्यांनी म्हटले आहे. ऋजुता आणि चेतन वडनेरे यांच्या सोबत अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिनेता गौरव मालनकर हे देखील या ट्रिपमध्ये एकत्र दिसले होते. शर्वरी जोग आणि गौरव मालनकर के दोघेही कलाकार एकमेकांच्या प्रेमात आहेत तशी कबुली देखील त्यांनी सोशल मीडियावर दिलेली पाहायला मिळते. अभिनेता चेतन वडनेरे हा झी मराठीवरील अल्टी पल्टी सुमडीत कल्टी या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसला होता. चेतन मूळचा नाशिकचा इथेच त्याने शालेय तसेच पदवीचे शिक्षण घेतले होते अभिनयाच्या ओढीने त्याची पावले मुंबईकडे वळली. नाटक, एकांकिका गाजवत असताना स्टार प्रवाहवरील लेक माझी लाडकी या मालिकेत अभिनयाची संधी मिळाली. या मालिकेत त्याला छोटीशी भूमिका मिळाली होती.

झी युवा वरील फुलपाखरू या लोकप्रिय मालिकेत तो झळकला याच मालिकेत ऋजुता धारप देखील महत्वाची भूमिका साकारताना दिसली. फुलपाखरू मालिकेतून चेतन आणि ऋजुता यांची ओळख झाली होती. आई माझी काळूबाई, वर्तुळ, क्राईम पॅशन, घरात मॅरीड बाहेर बॅचलर अशा मालिका आणि नाटकांमधून ऋजुता धारप प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. बहुतेक मालिकेतून ती विरोधी भूमिकाच साकारताना दिसली आहे. सन टीव्ही मराठी या नव्याने सुरू झालेल्या जाऊ नको दूर बाबा या मालिकेत देखील ऋजुता झळकताना दिसत आहे. अभिनयाच्या बाबतीत दोघेच सरस असल्याचं दिसून येते त्यामुळेच एकामागोमाग एक प्रोजेक्ट त्यांच्या हाती आलेले पाहायला मिळतात. चेतन वडनेरे हा झी वाहिनीवरील अल्टी पल्टी सुमडीत कल्टी यामालिकेमुळे प्रेक्षकांच्या घर घरात पोहचला त्याच्या त्या अभिनयामुळेच त्याला झी वाहिनीने काय घडलं त्या रात्री ह्या मालिकेत देखील अभिनय करायची संधी दिली आणि त्याने त्या संधीच सोन करून दाखवलं.