ऐश्वर्या राय एक देवी आहे तुलनेने माधुरी दीक्षित एक कुष्ठरोगी वेश्या आणि … माधुरीची बदनामी करणे पडले महागात

“द बिग बॅंग थिअरी” ही जगभरातील सर्वात मोठ्या हिट सिटकॉम्सपैकी एक आहे मात्र आता ती भारतात कायदेशीर रित्या अडचणीत आली आहे. कारण एका राजकीय विश्लेषकाने नेटफ्लिक्स विरुद्ध खटला दाखल केला आहे. कारण लोकप्रिय सिटकॉमने बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा अपमानजनक टिप्पण्या करून तिचा मोठा अपमान केला आहे असे या विश्लेषकाचे म्हणणे आहे. ओटीती प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स विरुद्ध अमेरिकन सिटकॉम ‘द बिग बँग थिअरी सिजन २’ मधील पहिल्याच भागावर खटला दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांच्यात तुलना करण्यात आली आहे. यामध्ये माधुरी दीक्षित विरोधात अपमानास्पद शब्द वापरण्यात आले आहेत.

राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार यांनी नेटफ्लिक्स विरुद्ध हा खटला दाखल केला आहे. द बिग बँग थिअरीच्या सीझन २ वर प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये, कुणाल नय्यरचे पात्र राज कूथरापल्ली आणि जिम पार्सन्सचे पात्र शेल्डन कूपर यांना बॉलीवूड अभिनेत्रींवर चर्चा करताना दाखवले आहे. यात चर्चा करत असताना त्यांनी ऐश्वर्या रायची माधुरी दीक्षितशी तुलना केली. या सीनमध्ये, शेल्डन कूपर ऐश्वर्या रायला “गरीब माणसाची माधुरी दीक्षित” असे म्हणतो, तर राज कूथरापल्ली उत्तर देताना म्हणतो की , “ऐश्वर्या राय एक देवी आहे, तुलनेने माधुरी दीक्षित एक कुष्ठरोगी वेश्या आहे”. माधुरी दीक्षितबद्दल केलेल्या प्रतिक्रिया ऐकून राजकीय विश्लेषकाने नेटफ्लिक्सविरोधात खटला दाखल केला आहे. मुंबईतील नेटफ्लिक्स कार्यालयाला त्यांच्याकडून कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. या एपिसोडवर आता देशभरात टिपण्णी करण्यात येत असून नेटफ्लिक्स विरोधात नेटक्यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. माधुरी दिक्षितला आहि अपमानास्पद टिपण्णी केल्याने आता मोठा वाद उफाळून आला आहे. दरम्यान यावर माधुरी दिक्षितने अजून कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र माधुरीच्या बाजूने तिचे चाहते आता आवाज उठवू लागले आहेत.

नेटफ्लिक्सला पाठवलेल्या नोटीसमध्ये मिथुन विजय कुमारने असे लिहिले आहे की, “माझा क्लायंट अशा आशयाचा समाजावर होणाऱ्या नकारात्मक प्रभावाबद्दल, विशेषत: हानिकारक रूढी आणि स्त्रियांविरुद्ध भेदभाव कायम ठेवण्याबद्दल खूप चिंतित आहे. हा आशय केवळ असंवेदनशीलच नाही तर लैंगिकता आणि दुराचार यांनाही प्रोत्साहन देतो, जे कोणत्याही स्वरूपात स्वीकारले जाणार.” अशी कायदेशीर नोटिसच त्यांनी बजावली आहे. ऐश्वर्याचे जगभर चाहते असल्याने तिचं नेहमीच कौतुक केलं जातं पण ह्याचा अर्थ असा होत नाही कि तिची वाहवाह करताना इतर अभिनेत्रींना दुय्यम स्थान द्यावं हा झालेला दुजाभाव आणि अपमान जनता आता सहन करणार नसल्याचं म्हटलं गेलं आहे.