कलाकारांचं खाजगी आयुष्य हे कधीच लपून राहत नाही. उलट अशा विषयाला हात घालून खऱ्या परिस्थितीव्यतिरिक्त तो अधिक कसा रंजक बनवला जाईल याकडे मीडियाचे लक्ष अधिक असते. तेजश्री प्रधानचे आयुष्य देखील शशांक सोबतच्या घटस्फोटानंतर चांगलेच रंगवलेले पाहायला मिळाले. चाहत्यांनी तिच्या घटस्फोटाबाबत तर अनेक प्रश्न उपस्थित केले एवढेच नाही तर तिच्या नातेवाईकांनी देखील तिच्या आईकडे याबाबत बोलून दाखवले होते. एका मुलाखतीत याबाबत तिने सांगितलेला हा किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत तिने नेमकं काय म्हटलं आहे ते पाहुयात…

तेजश्री मुलाखतीत विचारलेल्या एका प्रश्नावर म्हणते की , ‘आम्ही सेलिब्रिटी आहोत त्यामुळे आमचं खाजगी आयुष्य कोणापासून लपलेलं नाहीये माझंही आयुष्य कोणापासून लपलेलं नाही…जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये एक कठीण काळ आला तेव्हा कित्येक नातेवाईकांनी माझ्या आईला असं सांगितलं की काय गं तू तर एवढं देवाचं करतेस मग तुझ्या मुलीच्या आयुष्यात असं का व्हावं?…पण त्यावेळी माझ्या आईचं एक ठाम मत होतं ते मला आयुष्यभर पुरणार आहे…त्यावेळी ती खूप संयमाने म्हणाली होती की तिच्या आयुष्यात जे होतंय जे झालंय ते तिचं नशीब आहे ते बदलता नाही येणार आणि माझा देव काय जमिनीवर येऊन तिचं दैव नाही बदलू शकत…परंतु तिच्या वाट्याला जे लिहिलं गेलंय त्या सर्वांना तोंड द्यायची ताकद तिला मिळो हे मी देवाकडे मागणे करते…’
तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर होणार सून मी ह्या घरची मालिकेमुळे एकत्रित आले होते मालिकेच्या सेटवरच या दोघांचे प्रेम जुळून आले आणि त्यांनी लग्नही केले मात्र काही महिन्यातच या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता अगदी सेटवर देखील दोघांचे सिन एकत्रित शूट केले जात नव्हते इतपत त्यांचे प्रकरण शेवटच्या निर्णयावर पोहोचले होते. या घटनेनंतर तेजश्रीला मानसिक त्रासही झाला. याबाबत ती नेहमीच मोकळेपणाने बोलली देखील आहे.