सध्या टी२० विश्वकपमध्ये भारताने निराशाजनक खेळ खेळला आहे. सामन्यात टिकून राहण्यासाठी भारतीय संघाला दुसऱ्या संघावर अवलंबून राहण्याचीवेळ आली आहे. कामागून एक सामने आयपीएल यांमुळे खेळाडूंना आराम मिळाला नाही हे कारण समोर आणलं जात आहे. आयपीएल सामन्यातून भाटिया संघात प्रवेश करणाऱ्या दीपक चाहर ह्याच्या बद्दल माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत. यापुर्वी तो राजस्थान रॉयल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट आणि आता चेन्नई सुपर किंग्स तर्फे खेळताना पाहायला मिळतो. पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंग्लंडविरूध्द खेळला गेला त्यात त्याने चांगली कामगिरी देखील करून दाखवली आहे .

नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स टीमचा खेळाडू दीपक चाहरने सामना संपल्यावर जया भारद्वाज या गर्लफ्रेंडला सिनेस्टाईलने प्रपोज केले होते. त्यावेळी दीपक चाहर मिडियामध्यातून जोरदार चर्चेत आला होता शिवाय त्याच्या प्रपोज करण्याच्या स्टाईलवर अनेकजण फिदा झाले होते. या बातमीनंतर दीपक चाहरची बहीण मालती चाहर ही देखील सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवताना दिसली. दीपकची बहीण मालती चाहर ही मॉडेल तसेच बॉलिवूड अभिनेत्री आहे. आता लवकरच मालती चाहर तिच्या आगामी तामिळ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे हा तिचा दुसरा चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाअगोदर मालतीने जिनिअस या बॉलिवूड चित्रपटात काम केले होते. दिसायला अतिशय सुंदर असलेल्या मालतीने काही सौंदर्य स्पर्धा गाजवल्या आहेत. २००९ साली मिस अर्थ आणि २०१४ साली मालती फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभाग दर्शवला होता. फेमिना मिस इंडियाची ती सेकंड रनरअप ठरली होती. २०१८ साली आयपीएल सामन्यात मालती एक मिस्ट्री गर्ल म्हणून चर्चेत आली होती.

चेन्नई टीमच्या विजयानंतर मालतीने आनंद व्यक्त केला होता त्यावेळी तिचा चेहरा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर ही मुलगी दीपक चाहरची बहीण असल्याचे समजताच मालतीच्या फॅनफॉलोअर्समध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली होती. मालती तिचा भाऊ दीपक चाहरसोबत अनेक फोटोंमध्ये दिसते त्या दोघांच्या फोटोला अनेकांनी पसंती दर्शविलेली पाहायला मिळते. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मालतीने सुरुवातीच्या काळात मॉडेलिंगमध्ये आपले करिअर घडवले आहे. साड्डा जलवा…ह्या गाण्यात ती झळकली होती तर काही जाहिरातींमधून तिला झळकण्याची संधी मिळाली होती. लेट्समॅरी डॉट कॉम या वेबसिरीजमध्ये तिला पाहिले गेले होते. अभिनयासोबतच मालतीला डान्स आणि पेंटिंगची विशेष आवड आहे यासोबतच ती क्रिकेट देखील खेळताना दिसते. सोशल मीडियावर दीपक चाहरची बहीण म्हणून मालती आता लोकप्रियता मिळवताना दिसत आहे येत्या काळात ती दाक्षिणात्य सृष्टीत देखील आपला जम बसवताना दिसेल.