“तारक मेहता का उलटा चष्मा” ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यावरूनच या मालिकेची लोकप्रियता तुमच्या लक्षात येईल. मालिकेत आजवर अनेक नव्या पात्रांची एन्ट्री झाली तर कित्येकांनी ही मालिका सोडली त्यानंतरही प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात राहिली आहे. याच शोमध्ये दीप्ती हे पात्र जासुस बनण्याचे काम करत आहे. हे पात्र साकारले आहे अभिनेत्री “आराधना शर्मा” हिने. आराधना शर्मा हीने या मालिकेअगोदर स्प्लिट्सव्हीला शो आणि अलादिन या मालिकेतून काम केले आहे.

आराधना काही वर्षांपूर्वी कास्टिंग काउचच्या जाळ्यात अडकली होती ही बातमी तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती. या मुलाखतीतून तिने आपल्या सोबत घडलेल्या त्या घटनेचा उल्लेख केला आहे. ही लोकप्रियता मिळवण्यासाठी तिने आजवर अपार कष्ट केले आहेत असे ती या मुलाखतीत म्हणाली होती यावेळी बोलताना तिने एका घटनेबाबतही सविस्तर सांगितले की, जेव्हा मी चार पाच वर्षांपूर्वी पुण्यात शिकत होते त्यावेळी माझ्यासोबत ही घटना माझ्या शहरात रांची येथे घडली. रांची येथील माझ्या ओळखीचा एक व्यक्ती मुंबई येथे कोणत्यातरी प्रोजेक्टसाठी कास्टिंग करत होता. मी पुण्यात मॉडेलिंग करत होते त्यामुळे माझ्या शहरातील लोकं मला थोडेफार ओळखत होते. त्या व्यक्तीने मला रांचीला कास्टिंगसाठी बोलवले तेव्हा मी तिथं गेले. एका रूममध्ये आम्ही स्क्रिप्ट वाचत बसलो होतो त्यावेळी तो सतत माझ्याशी जवळ येत लगट करण्याचा प्रयत्न करत होता. त्याची ही गोष्ट मला सारखी खटकत होती मी तिथून उठले त्या खोलीचे दार उघडले आणि तिथून पळ काढला.

त्या दिवसानंतर मी फारशी कोणाशी बोलत देखील नसे अगदी माझ्या वडिलांची देखील मला भीती वाटू लागली होती. आपल्याला कोणीतरी हात लावण्याचा प्रयत्न करतंय असंच सारख वाटायचं” . आपल्या कास्टिंग काउचबद्दल बोलल्यानंतर आराधना हे देखील म्हणाली की सुरुवातीला काम मिळवण्यासाठी मी कास्टिंग एजन्सीला पोर्टफोलिओ पाठवला होता त्यावेळी एका कास्टिंग एजंटने ‘आम्हाला सुंदर मुलींची आवश्यकता आहे’ असे म्हणून माझा पोर्टफोलिओ पुढे देण्यास नकार दर्शवला होता. मी फिटनेसला जास्त महत्व देते, मार्शल आर्ट्सचेही मी प्रशिक्षण घेतले आहे त्यामुळे बऱ्याच जणांचे असे म्हणणे होते की मी पुरुषासारखी दिसते असे माझ्याबाबत अनेकदा घडले होते त्यामुळे मी हार न मानता सतत प्रयत्न करत राहिले…..