तारक मेहता मालिकेपेक्षा तुमची रिअल लाईफ मुलगी सुंदर दिसते….मुलीचा फोटो पाहून माधवी भाभीला चाहत्यांकडून मिळतायेत प्रतिक्रिया
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील आत्माराम भिडे आणि माधवी भाभी यांची भूमिका खूप लोकप्रिय ठरली आहे. २००८ पासून या मालिकेच्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं. पण मधल्या काळात वाद विवादामुळे काही कलाकारांनी या मालिकेला कायमचा निरोप दिला. पण अभिनेत्री सोनालिका जोशी आणि मंदार चांदवडकर हे मराठमोळे कलाकार या मालिकेचे अविभाज्य घटक बनले आहेत. सोनालिका जोशी हिने मराठी नाटक, मालिकेतून काम केल्यानंतर हिंदी सृष्टीत नशीब आजमावले.
यात तिला यश देखील मिळालं. झुळूक, आकाश पेलताना, वारस सारेच सरस, गहिरे पाणी अशा चित्रपटातही ती सहाय्यक भूमिकेत झळकली होती. पण गेली १६ वर्षे साकारत असलेल्या माधवी भिडे या पात्राने तिने मोठी लोकप्रियता मिळवलेली पाहायला मिळते. सोनालिका सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिच्या लाडक्या लेकिसोबत अनेकदा व्हिडीओ बनवताना दिसते. आर्या जोशी या तिच्या लेकीला गाण्याची आवड आहे. दोघी मायलेकी एकत्र गातानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.
ते पाहून सीरिअलमधल्या पेक्षा माधवी भाभीची रिअल लाईफ मुलगी सुंदर दिसते अशा तिला प्रतिक्रिया मिळत आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत माधवी भिडे यांच्या मुलीची भूमिका सध्या खुशी माळी साकारत आहे. याअगोदर ही भूमिका पलक सिधवानी हिने साकारली होती. पण या दोघीं पेक्षाही त्यांची रिअल लाईफ मुलगी आर्या जोशी खूप सुंदर दिसते असे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भविष्यात आर्या देखील आईच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात दाखल झाल्यास नवल वाटायला नको.