
सोनी मराठी वाहिनीवर स्वराज्यजनानी जिजामाता ही मालिका प्रसारित केली जात होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेत पुतळाराणीसाहेबांची भूमिका साकारली होती अभिनेत्री सायली सुनील जाधव या अभिनेत्रीने. सायली सुनील जाधव हिचे सागर बाकरे ह्याच्यासोबत नुकतेच लग्न झाले असून तिच्या या लग्नाला स्वराज्य जननी जिजामाता मालिकेतील नीना कुलकर्णी, गौरी किरण यासारख्या कलाकारांनी हजेरी लावली होती. सायली जाधव आणि सागर बाकरे यांनी २०१८ साली साखरपुडा केला होता.

त्यानंतर तब्बल तीन वर्षांनी ते विवाहबंधनात अडकताना दिसत आहेत. काल ३० नोव्हेंबर रोजी पुण्यात मोठ्या थाटात त्यांचा हा लग्नाचा सोहळा पार पडला आहे. सायली जाधव ही मराठी मालिका अभिनेत्री आहे. मुंबईत लहानाची मोठी झालेल्या सायलीने सेंट मेरीज इंग्लिश स्कुल मधून शिक्षण घेतले आहे. तर पाटकर वर्दे कॉलेजमधून तिने बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी प्राप्त केली आहे. गंध फुलांचा गेला सांगून या मालिकेतून सायलीने मुख्य भूमिका साकारली होती. कुलस्वामिनी, गणपती बाप्पा मोरया, बुद्ध, आंबट गोड सारख्या मालिकेतून तिला महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. हॉट अँड फास्ट या लघु पटातील तिच्या भूमिकेला उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार देण्यात आला होता. सायली उत्तम अभिनेत्री तर आहेच शिवाय ती एक व्यावसायिका देखील आहे. ‘Jiza jewels’ या नावाने तिचा आर्टिफिशिअल ज्वेलरीचा व्यवसाय आहे.

आणि तिच्या ह्या ज्वेलरीला कलाक्षेत्रात मोठी मागणी देखील आहे. गंध फुलांचा गेला सांगून या मालिकेमुळे सायली प्रेक्षकांचया घराघरात पोहोचली होती. पदर्पणातील पहिल्याच मालिकेने तिला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली. स्वराज्यजनानी जिजामाता या मालिकेतील पुतळा राणीसाहेबांची भूमिका सायलीने आपल्या अभिनयाने अतिशय सुरेख निभावलेली पाहायला मिळाली होती. अभिनेत्री सायली सुनील जाधव आणि सागर बाकरे या नवविवाहित दाम्पत्यास या नव्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…