लावणी हा महाराष्ट्रातील कलाप्रकार अनेकदा तमाशाचा हिस्सा म्हणून सादर केला जातो. सुरवातीला तमाशात महिला नृत्य ऐवजी पुरुष मंडळीच साड्या नेसून नृत्य सादर करायचे. लोकांसमोर तमाशाच्या माध्यमातून महिला येण्यास त्यांच्या घरातून विरोध होत असे पण आता चित्र फारच बददलेलं आहे. आता बऱ्याच महिला स्वतःचा लावणीचा फड काढून हि संस्कृती जपण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात. आज लावणीला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे परदेशातही अनेक महिला मुली लावण्यांवर नृत्य करताना पाहायला मिळतात.

आज आम्ही तुम्हाला अश्या एका मुलाबद्दल सांगणार आहोत ज्यांनी लावणी सादर करून अनेक बक्षिसे मिळवली आहेत . ह्या मुलाचं नाव आहे “स्वप्नील विधाते”. स्वप्नील हा मूळचा अमरावती जिल्ह्यातील बेलोरा या छोट्याश्या गावचा, शालेय जीवनापासूनच गॅदरींगमध्ये डान्स करताना हो हमखास पाहायला मिळायचा, पुढे ती कला गणेश उत्सव आणि नवरात्रीतही दाखवू लागला. लहानपणापासूनच त्याच नृत्य इतकं सुंदर होत कि पाहणारी मंडळी त्याच्यावर खुश होऊन त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव करायची. पण वडील पहिलवान असल्यामुळे त्याच्या ह्या कलेला घरातून पाठिंबा नव्हता शिवाय घरा शेजारील लोक नाव ठेवायचे. वडील पहिलवान आणि हा साड्या नसतो असं हिणवायचे. शेवटी वडिलांनी कंटाळून त्याला घरातून जाण्यास सांगितले. स्वप्नीलने एमबीए केलय शिवाय बीएससी हॉटल मॅनेजमेंट देखील केलय पण त्याच्या नृत्याची आवड काही जाईना म्हणून वडिलांनी हे टोकाचं पाऊल उचललं. पुढे तो अमरावतीत एका फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये नोकरी करू लागला. पण तेथील लोकांनी स्वप्नील हा खूपच सुंदर लावणी सादर करतो तू एक उत्तम डान्सर आहेस आणि तू हि कला जपायला पाहिज असं प्रोत्साहन दिल. त्यांच्या आग्रहाखातीर तो पुन्हा नृत्याकडे वळला.

अनेक ठिकाणी तो शो करतो. डान्स महाराष्ट्र डान्स ह्या शो मध्ये देखील तो झळकला होता. नुकतच स्वप्नीलला दिल्लीच केटिके फौंडेशन तर्फे त्याला “भारत गौरव” ह्या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलय. ढोलकीवर थाप पडली कि त्याचे पाय थिरकायला सुरवात होते. मुलगा असूनही एका उत्तम नृत्यांगनेला देखील तो मागे पाडेल असच त्याच नृत्य. अनेक बक्षिसे मिळाल्याने त्याचा झालेला सन्मान पाहून आता त्याच्या आई वडिलांना त्याचा हेवा वाटतो. वडील पहिलवान आणि मुलगा साडी घालून डान्स करतो असे हिणवणारे लोक देखील आता त्याच कौतुक करताना पाहायला मिळतात. त्यामुळे मित्रानो तुम्हाला जे जमतंय त्यात पारंगत व्हा “दुनिया झुकती हे झुकाने वाला चाहिये… चला तर मग पाहुयात त्याने धुमाकूळ घातलेला डान्स “नटले मी तुमच्यासाठी…