
अमिताभ बच्चन यांचा गाजलेला चित्रपट सुर्यवंशम आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. हा चित्रपट सेट मॅक्स वाहिनीवर वारंवार दाखवला जातो. त्यामुळे या चित्रपटाचे डायलॉगही आता प्रेक्षकांना तोंडपाठ झाले आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन सोबत दाक्षिणात्य अभिनेत्री सौंदर्याला देखील मोठी लोकप्रियता मिळाली. पण ही अभिनेत्री आज या जगात नाही हे जाणून अनेकांनी खेद व्यक्त केला. १७ एप्रिल २००४ रोजी एका खासगी प्लेट क्रॅशमुळे सौंदर्याचा मृत्यू झाला अशी बातमी त्यावेळी देण्यात आली होती. त्यावेळी ही अभिनेत्री भारतीय जनता पार्टी आणि तेलुगु देसम पार्टीच्या राजकीय प्रचार कार्यक्रमात भाग घेण्यासाठी करीमनगरला जात होती, ज्यामध्ये तिच्या भावाचाही मृत्यू झाला.
सौंदर्याचे अपघातात निधन झाले तेव्हा ती प्रेग्नंट असल्याचेही बोलले गेले. पण आता तिच्या निधनानंतर तब्बल २२ वर्षाने पुन्हा एक रहस्य समोर आले आहे. सौंदर्याचा अपघातात मृत्यू झाला नाही तर तिला मारलं गेलं आहि बातमी व्हायरल होत आहे. २२ वर्षानंतर दाक्षिणात्य अभिनेत्यावर तिला जीवे मारण्याच्या आरोपाखाली केस दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण आता पुन्हा बाहेर आल्याने दाक्षिणात्य राजकीय तसेच मनोरंजन वर्तुळात एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. सौंदर्याचा खू। न हा तिच्या मालमत्तेसंदर्भातील वादामुळे झाला असे आरोप लावण्यात आले आहेत.

फिर्यादीने मोहन बाबूवर विमान अपघातानंतर भावंडांवर जमीन विकण्यासाठी दबाव आणून बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा आरोप केला आहे. चिट्टीमल्लू असे तक्रारदाराचे नाव असून त्याने खम्मम एसीपी आणि खम्मम जिल्हा दंडाधिकारी या दोघांकडे तक्रार नोंदवली आहे. मंचू मनोजला न्याय मिळावा आणि जलपल्ली येथील ६ एकर अतिथीगृह जप्त करण्याची मागणी करत मंचू कुटुंबातील सुरू असलेल्या वादाचाही या तक्रारीत तपशील आहे. याशिवाय मोहन बाबूमुळे आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप तक्रारदाराने केला असून पोलीस संरक्षणाचीही मागणी केली आहे.