सूर नवा ध्यास नवा या म्युजिक शोमध्ये गायिका शाल्मली खोलगडे हिने परिक्षकाची भूमिका निभावली होती. शाल्मली खोलगडे ही बॉलिवूड चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गायिका आहे तसेच मराठी, तामिळ, तेलगू भाषिक चित्रपटातील गाणी तिने गायली आहेत. शाल्मली खोलगडे हिचा फरहान शेख सोबत नोंदणी पद्धतीने नुकताच विवाह संपन्न झाला आहे. यावेळी लग्नाला मोजक्याच नातेवाईक तसेच मित्रमंडळींना त्यांनी आमंत्रित केले होते. फरहान शेख हा साउंड इंजिनिअर असून संगीत क्षेत्राशी निगडित आहे.

२१ ऑक्टोबर रोजी शाल्मली खोलगडे हिने फरहान सोबतच्या नात्याला कबुली देणारी एक पोस्ट शेअर केली होती. प्रेमाची कबुली दिल्या नंतर एक महिन्यानि ते दोघेही विवाहबद्ध झाले आहेत. बलम पिचकारी, लट लगगई, शनिवार राती, परेशान, अग्गबाई, दारू देसी, शुद्ध देसी रोमान्स, चिंगम चबाके या हिंदी चित्रपट गाण्यांमुळे शाल्मलीने मोठी लोकप्रियता मिळवली आहे. हे मन माझे, जिंकूया ही मराठी चित्रपट गाणी देखील तिने गायली आहेत. २००९ साली तू माझा जीव या चित्रपटात शाल्मलीने मुख्य नायिकेची भूमिका बजावली होती. संगीताचे शिक्षण शाल्मलीने तिची आई उमा खोलगडे यांच्याकडे घेतले होते. त्यानंतर शुभदा पराडकर यांच्याकडे तिने संगीताचे धडे गिरवले. वयाच्या १६ व्या वर्षांपासूनच विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ती परफॉर्मन्स सादर करत असे. २०१२ साली प्ले बॅक सिंगर म्हणून बॉलिवूड चित्रपट इशकजादे मधील परेशान…हे गाणं गायची तिला संधी मिळाली.

या गाण्यामुळे शाल्मलीला तुफान प्रसिद्धी मिळाली. फिल्फेअरचा पुरस्कार देखील तिला या गाण्यामुळे मिळाला होता. शाल्मली खोलगडे आणि फरहान शेख हे दोघे आज विवाहबद्ध झाले आहेत. अगदी साध्या पद्धतीने त्यांचा हा लग्न सोहळा पार पडला आहे. त्यानिमित्ताने शाल्मलीला तिच्या चाहत्यांकडून भरघोस शुभेच्छा मिळताना दिसत आहे. आमच्या टीमकडून या नवविवाहित दाम्पत्यास मनःपूर्वक शुभेच्छा…