पारू मालिकेत अहिल्याच्या भावाची एन्ट्री पण…पोरीचं सत्य समजल्यावर मालिकेत येणार सर्वात मोठा ट्विस्ट
झी मराठी वरील पारू या मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नुकतेच पारूने तिची पहिली मंगळागौर अहिल्यादेवीकडून करून घेतली आहे. अर्थात आदित्य सोबत झालेल्या लग्नामुळे पारू तिचं मंगळागौरचं पूजन करताना पकडली गेली. पण सावित्रीमुळे ती यातून थोडक्यात बचावलेली पाहायला मिळाली. सावित्री आत्याची मंगळागौर करायची म्हणून अहिल्यादेवी या खेळाचा घाट घालते. पारूच्या आग्रहामुळे अहिल्यादेवी सुद्धा या खेळाचा भाग बनते. पण आता या मंगळागौर नंतर मालिकेत रक्षाबंधन साजरी होणार आहे. अहिल्यादेवी ही दरवर्षी तिच्या भावाला राखी पाठवते पण काही कारणास्तव तिचा हा भाऊ तिच्यावर नाराज असलेला दाखवला आहे. अहिल्याची राखी तो स्वीकारणार का हे आता मालिकेत पाहायला मिळणार आहे.
अहिल्याच्या भावाच्या भूमिकेत अभिनेता सुनील बर्वे झळकणार आहे. सुनील बर्वेची मालिकेत दमदार एन्ट्री होणार आहे. आर्याचं सत्य देखील आता उघडणार आहे. त्यामुळे पारू अहिल्यादेवीच्या भावाची नाराजी कशी दूर करते हे पाहणे रंजक होणार आहे. दरम्यान सुनील बर्वे मालिकेत एन्ट्री घेणार म्हणून प्रेक्षकांनी मालिकेबद्दल उत्सुकता दाखवली आहे. कारण याअगोदर पारूचे सततचे रडगाणे पाहून प्रेक्षकांना या मालिकेचा कंटाळा आला होता. या मालिकेवर प्रचंड टीका सुद्धा करण्यात येत होती. पण आता सुनील बर्वेच्या एंट्रीने मालिका रंजक होईल असे बोलले जात आहे. याअगोदर सुनील बर्वे सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत प्रमुखभूमिका साकारताना दिसले होते. या मालिकेनंतर ते चित्रपटाकडे वळले.
पण आता झी मराठीच्या पारू मालिकेत ते पुन्हा छोट्या पडद्यावर परतले आहेत. अवंतिका, कुंकू, कळत नकळत अशा अनेक चित्रपट मालिकेतून सुनील बर्वे यांनी सकारात्मक भूमिका साकारलेल्या आहेत. पारू मालिकेत त्यांची भूमिकाही अशीच असणार आहे. अहिल्यादेवीवर हा भाऊ का नाराज असतो याचा उलगडा लवकरच मालिकेतून होणार आहे. त्यामुळे हा ट्विस्ट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.