सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अभिमन्यू लतीकाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आणि आपला तुटलेला संसार पुन्हा जोडण्यासाठी बापूच्या घरी जातो. तिथे गेल्यावर मात्र बापूचा राग अनावर होतो आणि अभिमन्यूला ते घरातून हाकलून देतात. अभिमन्यू बापूला समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो लतिका माहेरी आणि सासरी दोन्ही घरी सुखी राहील असे तो आश्वासन देतो. मात्र अभिमन्यूच्या वागणुकीमुळे बापू त्याच्यावर विश्वास ठेवण्यास असमर्थ ठरतात. तर तिकडे अभिमन्यूचे वडील त्याची बाजू सावरण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अभिमन्यू आपला मुलगा आहे आणि त्याला जे पाहिजे ते मिळवून देण्याची ईच्छा ते व्यक्त करतात.

अभिमन्यूचे आई वडील दोघेही लतिका आणि अभिमन्यू पुन्हा एकत्र यावेत या तळमळीतून आपल्या भावना व्यक्त करतात. मालिकेत घडणाऱ्या या घडामोडीमध्ये आता नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. नंदिनीचे हे पात्र नेमके कोण साकारणार? आणि ही नंदिनी नक्की आहे तरी कोण? याबाबत उत्सुकता निर्माण होते. नंदिनीची भूमिका “अदिती द्रविड” ही अभिनेत्री साकारणार आहे. झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून अदितीने शनायाची मैत्रीण म्हणजेच ईशाची भूमिका साकारली होती. त्यानंतर अदिती आणि रसिका सुनील या दोघींची चांगली मैत्री झाली. या दोघींनी मिळून “यु अँड मी” हे व्हिडीओ सॉंग प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. अदिती अभिनयासोबतच गीतकार देखील आहे तिने लिहिलेलं गाणं तिच्या ‘झिलमिल’ या अल्बमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. स्टार प्रवाहवरील ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर -महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेतून तिने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची थोरली बहीण तुळसाची भूमिका साकारली होती. तिने साकारलेल्या या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. अदिती आता कलर्स मराठी वाहिणीवरच्या सुंदरा मनामध्ये भरली या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री घेत आहे. तिची ही भूमिका विरोधी असणार की आणखी काही हे येत्या काही भागातच स्पष्ट होईल . नंदिनीच्या भूमिकेसाठी अदिती द्रविडला मनापासून शुभेच्छा…