जरा हटके

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील अभिनेत्रीने लिहली भावनिक पोस्ट

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील देवकीची भूमिका साकारली आहे अभिनेत्री मीनाक्षी राठोड हिने . बाळूमामाच्या नावानं चांगभलं , नाळ अशा चित्रपट आणि मालिकेमधून मीनाक्षी झळकली होती. ड्राय डे, मनातल्या उन्हात चित्रपट अभिनेता कैलाश वाघमारे याच्यासोबत तिने लग्न केलं आहे. काही दिवसांपूर्वी मिनाक्षीच्या बहिणीच लग्न अगदी थाटात पार पडलं. मिनाक्षीने स्वतः आणि तिच्या बहिणींनी देखील इंटरकास्ट लग्न केलं असलं तरी यामागे आईचा भक्कम पाठिंबा त्यांना मिळाला.

actress minaxi rathod
actress minaxi rathod

काही दिवसांपूर्वी १९ वर्षाच्या कीर्ती थोरेची धक्कादायक घटना समोर आली. आपल्या आई आणि भावनेचा किर्तीचा अंत केला. या घटनेला अनुसरून मिनाक्षीने एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये मीनाक्षी आपल्या आईला उद्देशून म्हणते की,आई…1) मोठ्या ताईचं intercaste लग्न झालं तेव्हा लोकांनी खूप त्रास दिला तुला. मी पाहिलंय. किती राग आला असेल न तुला ताई चा.2) माझं कैलाश सोबत intercaste लग्न झालं तेव्हा लोकांनी जवळ जवळ तुला त्यांच्यात गृहीत धरणं सोडलं होतं. किती किती राग आला असेल तुला माझा!पण कायम उसाचे पाचड अंगाखांद्यावर बाळगणारा तांडा आणि पुढारल्या पणाचे सोंग मिरवणारी आपली शहरातली कॉलनीही तुझ्या एका स्वीकाराने तुझ्या सोबत ऊभी राहीली! 3) काल परवा आपल्या लहान मुलीचं ही intercaste लग्नं मोठ्या थाटात लावून दिलस. आणि सगळ्यांनाच जणू हीच कशी नवीन जन रीत आहे हे सांगून दिलेस! हे स्विकाराचंं बीज तुला कुठे गवसलं?आपल्याला 5 मुली असतांना सुद्धा एवढं कसं तू स्वतःला सांभाळलस.! राग कसा ग control केलास?

minakshi rathod post
minakshi rathod post

ते ही पप्पा नसतांना ,तुला नाई का ग आम्हाला मारून टाकावस वाटलं? हे असच “कीर्ती थोरे “च्या आईला का नाई वाटलं एवढं राग अनावर होत असतो का प्रतिष्ठे पाई? तिने तर जातितच लग्न केले होते. तुझ्या एवढं नाई फक्त एकाच मुलीला स्वीकारायचं होते तिला. पोटच्या मुलीचा इतक्या अमानुषपणे खून करावसं वाटणं या पेक्षा क्रूर काय असू शकतं या जगात. काश माझ्या सारखी आई कीर्ती ला लाभली असती तर? आणि हो! स्वप्निल शुभम सारखे भाऊ ही! या बेगडी प्रतिष्ठेच्या बंजर जमिनीवर तुझ्या स्विकाराचंं बियाणं सापडूदे आई! काल परवाच सकारात्म वाटणारी तुझ्या वाढदिवशी लिहिलेली पोस्ट,आज ही घटना एकूण अस्वस्थ करणारी आहे.” सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील देवकीची भूमिका साकारली आहे अभिनेत्री मीनाक्षी राठोड हिने हि पोस्ट लिहली आहे तिच्या मनातील भावनांमुळे अनेक कलाकारांनी तिला कमेंट करत साथ दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button