स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत रंजक घडामोडी घडताना दिसत आहेत . मालिकेत खोट्या जयदीपचे सत्य सर्वांसमोर यावे म्हणून गौरी प्रयत्न करताना दिसत आहे. एकीकडे गौरीचे हे प्रयत्न सुरू असतानाच ती शालिनी आणि देवकीला चांगलीच अद्दल घडवत आहे. गौरीचा हा डॅशिंग लूक प्रेक्षकांना आवडला आहे. त्यामुळे मालिकेचा टीआरपी निश्चितच वाढला आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील कलाकार मंडळी सध्या लग्नाच्या धामधुमीत रंगलेली पाहायला मिळत आहेत. या मालिकेतील अभिनेत्याचं नुकतंच लग्न पार पडलं आहे.

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतही उदय म्हणजेच अभिनेता संजय पाटील ह्याचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे. त्याच्या लग्नाला मालिकेतील अम्मा म्हणजेच आशा ज्ञाते, माधवी निमकर, अपर्णा शार्दूल, कपिल होणराव यांनी हजेरी लावली होती. संजय पाटील आणि अबोली गोखले यांचे पारंपरिक पद्धतीने लग्न झाले आहे. यावेळी उपस्थितांच्या आग्रहाखातर संजयने पुष्पाचा एक डायलॉग उखाण्यामध्ये घेतलेला पाहायला मिळाला. ‘ ही माझ्या आयुष्यात आली आणि मी झालो तिचा दिलवाला, मै झुकेगा नहीं साला…’ असे म्हटल्यावर उपस्थितांनि मात्र टाळ्या वाजवून संजयला भरभरून दाद दिली. लग्नागोदर संजय आणि अबोली यांचा मेहेंदि आणि हळदीचा सोहळा पार पडला. त्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही महिन्यांपूर्वी संजय आणि अबोलीचा साखरपुडा पार पडला होता . सोशल मीडियावर त्याने ही आनंदाची बातमी शेअर केली होती. त्यावर अनेकांनी शुभेच्छाचा वर्षाव केलेला पाहायला मिळाला.

अबोली गोखले ही एक वेलनेस ब्लॉगर असून त्यात ती योगाचे महत्व सांगताना दिसते. ५ नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांचा साखरपुडा पार पडला होता. सुख म्हणजे नक्की काय असतं ह्यामालिकेपूर्वी देखील संजयने काही मालिकांत काम केले आहे पण त्याला सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमुळे खरी प्रसिद्धी मिळाली. शरीराने उंच आणि देखणा चेहरा यामुळे संजयला विविधांगी भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. सुकन्या, जय मल्हार, महाराष्ट्र जागते रहो यासारख्या काही मोजक्या मालिकांमधून देखील प्रेक्षकांसमोर आला आहे. मालिका करण्यापूर्वी त्याने अनेक नाटकांतून काम केले होते. कमिंग सून, मुख्यमंत्री, लेडीज बार, रानजाई अशी त्याची काही गाजलेली नाटकं आहेत. अबोली आणि संजय पाटील या नवविवाहित दाम्पत्यास आयुष्याच्या या नव्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…