Breaking News
Home / जरा हटके / “सुख म्हणजे नक्की काय असतं” मालिकेतील या कलाकाराने घेतली महागडी कार किंमत पाहून थक्क व्हाल

“सुख म्हणजे नक्की काय असतं” मालिकेतील या कलाकाराने घेतली महागडी कार किंमत पाहून थक्क व्हाल

ह्या महिन्यात अनेक मराठी कलाकारांच्या घरी नवी कार दाखल झाली आहे. संजीव , हार्दिक जोशी यांच्या घरी नवे चार चाकी वाहन दाखल झाले तर अभिनेता अमेय वाघ याने मर्सिडीज बेंझ विकत घेऊन एक सुखद धक्काच त्याच्या चाहत्यांना दिला. मराठी सृष्टीतील कलाकारांची ही प्रगती पाहून अनेकांनी या कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतेच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील जयदीप म्हणजेच अभिनेता मंदार जाधव याने देखील मर्सिडीज बेंझ गाडी विकत घेतली आहे. त्याच्या या गोड़ बातमीने त्याला चाहत्यांकडून शुभेच्छा मिळत आहेत. सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.

actor mandar jadhav family
actor mandar jadhav family

महेश कोठारे यांची निर्मिती असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मधल्या काळात या मालिकेला टीआरपीच्या बाबतीत मोठी लीड मिळालेली दिसली होती. गौरी आणि जयदीपची जुळून आलेली केमिस्ट्री या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. वेळोवेळी गौरीची बाजू सावरणारा जयदीप तितकाच भाव खाऊन जाताना तितकाच समंजस आणि रुबाबदार असलेला दिसतो त्यामुळे हा जयदीप सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आज जयदीपच्या रिअल लाईफबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत…जयदीपची भूमिका साकारणारा मंदार जाधव हा सुरुवातीला हिंदि सृष्टीत नावारूपाला आला होता. मंदारचे वडील सुभाष जाधव हे देखील लेखक, दिग्दर्शक आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ते या कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. मंदारला लहानपणी क्रिकेटर व्हायचं होत शरदाश्रम शाळेत असताना रमाकांत आचरेकर यांच्याकडे तो क्रिकेटचे धडे गिरवत होता मात्र पुढे कॉलेजला गेल्यावर एनसीसी जॉईंट केलं त्यानंतर क्रिकेटची आवड मागे पडली. यावेळी देशसेवेत रुजू व्हावं अशी मनोमन ईच्छा होती मात्र नशिबाच्या पुढे कोणाचे काहीच चालत नाही अगदी तसेच मंदारच्या बाबतीत घडले. मंदारचा धाकटा भाऊ मेघन जाधव हा लहान असल्यापासून अनेक हिंदी मालिकांमध्ये झळकला आहे. एकदा एका ऑडिशनला मंदार त्याच्यासोबत गेला होता तेव्हा तिथे त्यालाही ऑडिशन देण्यासाठी सांगितले.

mandar jadhav new car with family
mandar jadhav new car with family

आम्हाला असाच चेहरा हवा आहे म्हणून मंदारची देखील ऑडिशन घेण्यात आली. २००६ मध्ये “से सलाम इंडिया” या हिंदी चित्रपटातून त्याचे अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले. त्यानंतर झी टीव्ही वरच्या “अल्लादिन” मालिकेत भूमिका मिळाली. या भूमिकेने मंदारला खूप लोकप्रियता मिळाली होती. वीर शिवाजी, बालिका वधू, महावीर हनुमान, पवित्र रिश्ता, प्यार का दर्द है मिठा मिठा अशा अनेक मालिकांमधून विविधांगी भूमिका त्याने साकारल्या आहेत. हिंदी मालिका गाजवल्यानंतर त्याने आपली पावले मराठी सृष्टीकडे वळवली. “श्री गुरुदेव दत्त” या मालिकेत दत्तात्रयाची मुख्य भूमिका साकारण्याची संधी त्याला मिळाली. मात्र काही कालावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. त्यानंतर सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत पुन्हा एकदा प्रमुख नायक साकारण्याची संधी त्याला मिळाली. आपल्या अभिनयातून त्याने साकारलेला समंजस जयदीप प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. जी मर्सिडीझ कार घेतली आहे तिची बेसिक किंमत हि जवळपास ४० लाख रुपये असून ऑन रोड प्राईज हि ४७ लाखांच्या जवळपास असल्याचं बोललं जातंय.मंदारची पत्नी मितीका शर्मा जाधव ही देखील हिंदी मालिका अभिनेत्री आहे. मंदारसोबत लग्नानंतर तिने मालिका क्षेत्रात काम करणे कमी केले आहे. मंदारच्या रूपाने एक मराठमोळा कलाकार हिंदी मालिका सृष्टीत अधिराज्य गाजवताना दिसत आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *