सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत शालिनीची भूमिका साकारली आहे अभिनेत्री “माधवी निमकर” हिने. १७ मे १९८२ रोजी खोपोली ,रायगड जिल्ह्यात तिचा जन्म झाला. अभिनयात तिचे पाऊल पडले ते अनपेक्षितपणेच त्याबद्दल आज अधिक जाणून घेऊयात. अभिनेत्री माधवी निमकर हिची मावस बहीण म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री “सोनाली खरे” हिच्यामुळे ती अभिनय क्षेत्रात आली. घडलं असं कि सोनालीच शूटिंग असताना तिच्यासोबत माधवी देखील शूटिंगला जायची.

सोनाली खरे ने सावरखेड एक गाव, हृदयांतर, स्माईल प्लिज, वेलडन बेबी,तेरे लिये, चेकमेट सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटातून महत्वपूर्ण भूमिका पार पाडल्या आहेत. अभिनेत्री सोनाली खरे हि हिंदी सृष्टीतील अभिनेता बिजय आनंद याच्याशी सोनाली विवाहबद्ध झाली. अभिनेता बिजय आनंद हा एक उत्कृष्ठ अभिनेता आहे आजही त्याला आपण छोट्या पडद्यावर पाहतो. सुरवातीला त्याने बॉलीवूड मध्ये अनेक चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. माधवी आणि सोनाली या दोघी मावस बहिणी आहेत हे कित्येकांना परिचयाचे नसावे. खोपोलित आपले संपुर्ण शिक्षण झालेली माधवी आपल्या बहिणीसोबत मुंबईला चित्रीकरणाच्या सेटवर जायची. यातूनच तिच्यात अभिनयाची गोडी निर्माण झाली. २००९ साली ‘बायकोच्या नकळत’ या चित्रपटातून माधवीचे कलाक्षेत्रात आगमन झाले. दुसऱ्या वर्षी असा मी तसा मी या चित्रपटात ती झळकली. त्यानंतर नवरा माझा भवरा, सगळं करून भागलं, धावा धाव, संघर्ष अशा चित्रपटातून ती विविधांगी भूमिकेत झळकली.

स्वप्नांच्या पलीकडले मालिकेमध्ये तिने साकारलेल्या विरोधी भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. हम तो तेरे आशिक है ही हिंदी मालिकाही तिने साकारली. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून तिने शालिनीचे विरोधी पात्र साकारले आहे. शालिनी आणि देवकी मिळून गौरी विरोधात जी कटकारस्थाने करतात त्यामुळे माधविला प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अर्थात ही तिच्या सहजसुंदर अभिनयाची पावतीच म्हणावी लागेल. माधवी निमकर विक्रांत कुलकर्णी यांच्याशी विवाहबद्ध झाली असून तिला रूबेन नावाचा गोंडस मुलगाही आहे. सध्या शुटींगमुळे माधविला सेटवरच राहावे लागत असल्याने अनेक दिवस मुलाशी भेट होत नाही याची खंत तिने काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.