
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका अभिनेत्री मीनाक्षी राठोड हिने नुकतेच बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. प्रेग्नंन्ट असूनही मीनाक्षी स्वतःची आणि होणाऱ्या बाळाची काळजी घेत ती मालिकेचे शूटिंग करत आहे. तिच्या या निर्णयाचे मोठे कौतुक केले जात आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत तिने देवकीची भूमिका साकारली आहे. प्रेग्नंटच्या बातमीने मीनाक्षी ही मालिका सोडणार असे वर्तवले जात होते मात्र अशा परिस्थितीत देखील ती शूटिंगमध्ये व्यस्त असलेली दिसून येते. त्याचमुळे तिच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केले जात आहे. बाळाच्या आगमनाची चाहूल लागलेल्या मिनाक्षीने अगोदरच एक आनंदाची बातमी जाहिर केली आहे.

हि बातमी दुसरी तिसरी काही नसून पती कैलास आणि तिने दोघांनी मिळून एक नवीकोरी कर विकत घेतली आहे. मीनाक्षी आणि अभिनेता कैलाश वाघमारे यांनी नुकतीच एक गाडी खरेदी केली आहे. त्यामुळे त्यांच्या आनंदात आणखी एक भर पडली आहे. ‘दोनाचे चार झाले’ असे म्हणत या दोघांनी गाडी खरेदी केल्याची बातमी जाहीर केली आहे. कैलाश वाघमारे ह्याने देखील मराठी हिंदी चित्रपट सृष्टीत नाव कमावले आहे. तानाजी या बॉलिवूड चित्रपटात कैलाशने चुलत्याची भूमिका गाजवली होती. त्याच्या या भूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले होते. शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, दिठी, एक पंजाब ये भी अशा अनेक दर्जेदार चित्रपट नाटकातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मराठी सृष्टीत त्याने स्वतःची ओळख निर्माण केलीच आहे शिवाय हिंदी सृष्टीतही तो अनेक दर्जेदार नाटकातून काम करताना दिसतो. बाळाच्या आगमनाच्या चाहुलीनेच मीनाक्षी आणि कैलाश मनोमन आनंदून गेले आहेत. त्यात पहिली वहिलीगाडी खरेदी करण्याचा अनुभव त्यांचा आनंद द्विगुणित करणारा ठरला आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील देवकीची भूमिका साकारली आहे अभिनेत्री मीनाक्षी राठोड हिने . बाळूमामाच्या नावानं चांगभलं , नाळ अशा चित्रपट आणि मालिकेमधून मीनाक्षी झळकली होती. ड्राय डे, मनातल्या उन्हात चित्रपट अभिनेता कैलाश वाघमारे याच्यासोबत तिने लग्न केलं आहे. काही दिवसांपूर्वी मिनाक्षीच्या बहिणीच लग्न अगदी थाटात पार पडलं. मिनाक्षीने स्वतः आणि तिच्या बहिणींनी देखील इंटरकास्ट लग्न केलं असलं तरी यामागे आईचा भक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. काही दिवसांपूर्वी १९ वर्षाच्या कीर्ती थोरेची धक्कादायक घटना समोर आली. आपल्या आई आणि भावनेचा किर्तीचा अंत केला. या घटनेला अनुसरून मिनाक्षीने एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये मीनाक्षी आपल्या आईला उद्देशून अनेक चांगल्या गोष्टी मांडल्या होत्या ती पोस्ट सोशिअल मीडियावर तुफान व्हायरल झालेली पाहायला मिळाली.