सुख म्हणजे नक्की काय असत मालिकेतील अम्मा म्हणजेच अभिनेत्री आशा ज्ञाते यांच्या मुलीचं नुकतंच लग्न झालं आहे. आशा ज्ञाते ह्या गेल्या वीस ते बावीस वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून भूमिका साकारल्या आहेत. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील अम्माच्या भूमिकेने त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. आशा ज्ञाते यांना रिमा आणि रेश्मा या दोन मुली आहेत. रेश्मा दाते या आरजे म्हणजेच रेडिओ जॉकी म्हणून ओळखल्या जातात तर त्यांनी नुकतेच अभिनय क्षेत्रात देखील पाऊल टाकलं आहे.

‘अमृत अनुभव’ या शॉर्टफिल्ममध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली आहे तर कलर्स मराठीवर नुकतीच सुरू झालेली ‘आई’ या मालिकेतुन त्यांचे छोट्या पडद्यावर पदार्पण झालं आहे. आशा ज्ञाते यांची मुलगी रिमा ज्ञाते ओंकारसोबत नुकत्याच विवाहबंधनात अडकल्या आहेत. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील सर्वच कलाकारांनी रिमा आणि ओंकारच्या लग्नाला हजेरी लावली होती. ‘अम्माच्या मुलीचं लग्न’ असे कॅप्शन देऊन ह्या कलाकारांनी रिमा आणि ओंकारला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अम्मा म्हणजेच आशा ज्ञाते या गेल्या २२ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या मूळच्या नाशिकच्या आहेत. मुंबईत आल्यावर त्यांनी काही काळ नोकरी केली होती. अभिनय क्षेत्रात त्यांचे पाऊल ओघानेच पडले असे म्हणायला हरकत नाही. कामगार कल्याण केंद्र च्या जाणीव या हौशी नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले होते. यात त्यांनी साकारलेली सासूबाई खूपच उठावदार ठरली असल्याने त्यांना पुरस्कार मिळाला होता.

मी रेवती देशपांडे, यदा कदाचित, आम्ही पाचपुते, जागो मोह प्यारे, सौजन्याची ऐशी तैशी, गोठ, लक्ष्य, राजा शिवछत्रपती, स्वामी समर्थ, आमचं सगळं सात मजली, नटसम्राट, अवघाची हा संसार, या सुखांनो या, माझिया प्रियाला प्रीत कळेना अशा नाटक आणि मालिकेतून काम केलं आहे. साधारण २०१८ साली त्यांनी आपल्या वयाच्या ५६ व्या वर्षी नाट्यशास्त्र विषयाची पदवी प्राप्त केली आहे हे विशेष. शास्त्रीय संगीताच शिक्षणही त्यांनी घेतलं असून विविध संगीत नाटकातून त्यांनी आपली कला जोपासली आहे. आज अम्माच्या भूमिकेमुळे आशा ज्ञाते यांच्या अभिनयाचं कौतुक केलं जात आहे. अम्मा ही घरकाम असणारी स्त्री जरी असली तरी गौरीची आई म्हणूनच त्यांना ओळख मिळाली आहे. कर्नाटकी भाषेत बोलणारी ही अम्मा प्रेक्षकांना देखील खूप जवळची वाटते. त्यामुळे अम्माचे पात्र मुख्य भूमिकेसारखेच उठावदार असलेले पाहायला मिळते.