Breaking News
Home / जरा हटके / सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत होणार बिगबॉसच्या घरातील ह्या प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत होणार बिगबॉसच्या घरातील ह्या प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत आता नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. अनेक मालिकांमधून झळकलेला अभिनेता विकास पाटील आता गौरी आणि जयदीपच्या आयुष्यात येणार आहे. विकास बिग बॉस सीझन ३ मध्ये दिसला होता. विकासच्या एन्ट्रीची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. सतत काही ना रंजक वळणं घेत लोकप्रियतेचा आलेख वाढता ठेवणाऱ्या मालिकांच्या यादीत सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आहे. जयदीप आणि गौऱी यांच्या आयुष्यात आता काय नवीन होणार हे पाहण्याची प्रेक्षकांचा ओढ लागलेली असते. सध्या गौरी ही शिर्केपाटलांच्या उद्योगसमूहाची मालकीण बनली आहे. त्यामुळे शालिनीवहिनींच्या कटकारस्थांनांना नेहमीप्रमाणेच उधाण आलेलं आहे. मालिकेतील कथेला नवं वळण देण्यासाठी लवकरच या मालिकेत एका नव्या पात्राची भर पडणार आहे.

sukha mhanje nakki ast gauri
sukha mhanje nakki ast gauri

आता हे पात्र कोणतं आणि ते कोणती भूमिका बजावणार हे अजूनही रहस्य असून येत्या काही भागांमध्ये प्रेक्षकांना उलगडा होणार आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत आजपर्यंत अनेकदा नव्या पात्रांची एन्ट्री झाली आहे. त्या नव्या पात्राच्या येण्याने मालिकेच्या लोकप्रियतेत भरच पडली आले. यापूर्वी जयदीप आणि गौरी यांच्या आयुष्यात मानसीच्या रूपाने अश्विनी कासारची काही एपिसोडमध्ये एन्ट्री झाली होती. अश्विनी अखेर शालिनी वहिनींचंच प्यादं असल्याचं सिध्द झालं. गौरीला कड्यावरून ढकलून देणारी मानसीच होती. मानसीचा म्हणजेच अश्विनी कासारचा ट्रॅक संपला तरी तिच्या पात्राने मालिकेला रंजक वळण मिळालं होतं. काही दिवसांपूर्वी या मालिकेत यूट्यूबर मधुरा बांचल यांचीही एन्ट्री झाली होती. एका रेसिपी स्पर्धेच्या परीक्षक म्हणून मधुरा यांनी भूमिका केली. आता या मालिकेत एक नवा अभिनेता दाखल होणार आहे. बिग बॉस शोच्या तिसऱ्या पर्वातील स्पर्धक विकास पाटील या मालिकेत नवीन भूमिका साकारणार आहे. गेल्या आठवड्यात विकासच्या नव्या भूमिकेसह चित्रीकरण सुरू झाले. यानिमित्ताने विकासने मालिकेच्या सेटवर येऊन प्रत्येक कलाकाराची भेट घेतली. आता या मालिकेत विकास नेमकी काय भूमिका करणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

actor vikas patil family
actor vikas patil family

सध्या गौरीला बाळाची चाहूल लागली आहे. तसेच रेसिपी स्पर्धेत जिंकलेली बाइक गौरीने जयदीपला भेट म्हणून दिल्याने ही जोडी खुश आहे. अशा वळणावर गौरी आणि जयदीप यांच्या आयुष्यात होणारी नव्या पात्राची एन्ट्री कशी असेल याची उत्सुकता लागली आहे.या नव्या पात्राची भूमिका अभिनेता विकास पाटील साकारणार आहे. मुळातच विकास हा सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा फॅन आहे. इतकच नव्हे तर विकासची आई आणि सासूबाई यांनाही ही मालिका खूप आवडते, त्यामुळे इतर प्रेक्षक आणि चाहत्यांबरोबरच विकासची या मालिकेतील एन्ट्री ही त्याच्या आई आणि सासूबाईं यांनाही ट्रीट असेल असं तो म्हणतो. पुणेकर असलेल्या विकासने अभिनयाचे शिक्षण घेतलं आहे. हमीदाबाईंची कोठी या नाटकातील त्याच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं. शेंटीमेंटल या सिनेमातही विकासची भूमिका होती. चार दिवस सासूचे या मालिकेने विकासला ओळख दिली. अधुरी एक कहानी या मालिकेतून विकासने छोट्या पडद्यावर पाऊल टाकलं. आंतरपाट, कुलवधू, माझिया माहेरा, लेक माझी लाडकी, आणि वर्तुळ या त्याच्या गाजलेल्या मालिका आहेत. आता तो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत दिसणार असल्याने चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *