अनके दिवसांपासून स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं हि मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. गरीब घरातील मुलगी घरकाम करून त्याच घरातील मुलासोबत लग्न करते मग त्या घरातील महिला तिच्या कशा विरोधात जातात हे ह्या मालिकेतून पाहायला मिळतं. मालिकेत नवनवी कटकारस्थाने आणि नवनवीन थीम घेऊन किंवा खेळ घेऊन हि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका उगीचचच वाढवण्याचं प्रयत्न करताना पाहायला मिळतेय. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील अभिनेत्याचा नुकताच साखरपुडा झाला आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत उदयची भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजेच संजय पाटील या कलाकाराचा नुकताच साखरपुडा झाला आहे. सोशिअल मीडियावर आपले फोटो शेअर करत त्याने आपल्या चाहत्यांना हि खुशखबर दिली आहे. अभिनेता संजय पाटील ह्याचा अबोली गोखले हिच्याशी साखरपुडा झाला आहे. अबोली गोखले हिला लिखाणाची विशेष आवड आहे. अबोली गोखले ही एक वेलनेस ब्लॉगर असून त्यात ती योगाचे महत्व आणि त्यापासून मेंदू आणि शरीराला शांत ठेवायचे फायदे तसेच पोषणतज्ञ त्यांची पाहायला मिळते. अभिनेता संजय पाटील आणि अबोलीचा साखरपुडा ५ नोव्हेंबर २०२१ रोजी पार पडला आहे. दिवाळीत पाडव्याच्या मुहूर्तावर त्याचा हा सोहळा संपन्न झालेला दिसून येतो. ह्या सोहळ्याचे फोटो शेअर करताना तो म्हणतो “माझे आयुष्य सुंदर करणारी परी आहेस तू, मनापासून तुझ्यावर जीव लावणाऱ्या या हृदयाची राणी आहेस तू, आजपासून मी कधीही एकटा चालणार नाही”. सुख म्हणजे नक्की काय असतं ह्यामालिकेपूर्वी देखील त्याने काही मालिकांत काम देखील केले आहे पण त्याला खरी प्रसिद्धी ह्याच मालिकेमुळे मिळाली असं तो म्हणतो.

अभिनेता संजय पाटील हा सुकन्या, जय मल्हार, महाराष्ट्र जागते रहो अश्या काही मोजक्या मालिकांतून तो यापूर्वी देखील प्रेक्षकांसमोर आला आहे. मालिका करण्यापूर्वी त्याने अनेक नाटकांत देखील अभिनय साकारला आहे. कमिंग सून, मुख्यमंत्री, लेडीज बार, रानजाई अशी त्याची काही गाजलेली नाटके ह्यामुळेच त्याला मालिकेत झळकायची संधी देखील मिळाली. उत्तम शरीरयष्टी देखणं रुप आणि डायलॉग बोलायची स्टाईल यामुळे त्याचा अभिनय जास्तच खुलून येतो. या मालिकांसोबतच काही चित्रपटात देखील त्याने अभिनय साकारला आहे. पण सुख म्हणजे नक्की काय असत हि मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना पाहायला मिळते त्यामुळेच अभिनेता संजय पाटील ह्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील उदयची भूमिका साकारणारा अभिनेता संजय पाटील आणि त्याची होणारी पत्नी अबोली गोखले याना त्यांच्या आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…