
सोशल मीडिया म्हणलं की तिथे नेहमीच कोणत्या न कोणत्या प्रकारची चर्चा होतच असते. त्यातही मनोरंजन विश्व म्हणलं की तिथे अनेक बदल होत असतात. कधी कोणत्या कलाकाराची एक्झिट होते तर कधी नवीन कलाकार मालिकेत नव्या भूमिकेत दिसतात. मालिकेची रंजकता टिकवून ठेवण्यासाठी कलाकार खूप मेहनत घेताना दिसतात. मालिका विश्वात काही नवीन घडत असेल तर ते फार काळ लपून राहत नाही. मनोरंजन विश्वातील अनेक बातम्या ह्या सातत्याने बाहेर येतच असतात. कमी वेळेत लोकप्रिय झालेल्या मालिकेतील कलाकारांचे अनेक जण चाहते बनतात आणि मग त्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

कलाकारांच्या चाहत्यांना देखील त्यांच्या आवडत्या कलाकाराबद्दल जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. अलीकडेच एक कलाकार मोठ्या संकटात सापडला होता. सुख म्हणजे नक्की काय असत मधील मल्हार म्हणजेच अभिनेता कपिल होनराव याच्या कुटुंबावर संकट आलं होत. गेले तीन महिने हे कपिल च्या कुटुंबासाठी फार भयानक होते. कपिल च्या बाबांना कोरोणा झाला होता. त्यातून ये यशस्वीरीत्या बाहेर पडले. ते बरे होऊन घरी आले होते. पण घरी आल्यावर त्यांना वेगळाच त्रास जाणवू लागला होता. कपिल च्या बाबांच्या डोळ्याला भयंकर सूज आली होती. आणि त्यासोबतच त्यांची ऑक्सीजन लेव्हल पण खालावली होती. त्यांची शुगर लेव्हल पण वाढत जात होती. कपिल च्या बाबांना पुन्हा हॉस्पिटल मधे घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी त्यांची सर्जरी करावी लागेल असे सांगितले. ह्या दरम्यान कपिल घरी न्हवता. कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील शूटिंग बंद करण्यात आले होते. त्यामुळे मालिकांचं शूटिंग हे महाराष्ट्राबाहेर होत होत. कपिल शूटिंग निमित्त महाराष्ट्राबाहेर होता. आणि त्यामुळे त्याच घरी जाणं शक्य न्हवत.

डॉक्टरांनी जेव्हा कपिल च्या बाबाची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी त्याचे बाबा वाचण्याचे फक्त तीस टक्के चान्स आहेत अस कपिल ला सांगितल. तब्बल पाच तास कपिल च्या बाबांचं ऑपरेशन सुरू होत. कपिल भयंकर टेन्शन मधे होता. पण कपिल चे बाबा हे फायटर ठरले. त्यांनी फायटर स्पिरीट दाखवल आणि त्यांचं ऑपरेशन यशस्वी झालं. कपिल च्या बाबांना ब्लॅक फंगस झाला होता. आधी कोरोणा आणि नंतर लगेच ब्लॅक फंगस झाल्याने कपिल च कुटुंब टेन्शन मधे होत. पण कपिल च्या बाबांनी कोरोणा आणि ब्लॅक फंगस ह्या दोन्ही आजारांवर यशस्वीरीत्या मात केली. अलीकडेच फादर्स डे निमित्त कपिल ने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर त्याच्या बाबांच्या आजाराबद्दल सांगितल होत.