सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. सुरुवातीपासूनच जयदीप आणि गौरीची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती मात्र आता लवकरच या मालिकेतून गौरीच्या लूकमध्ये मोठा बदल घडून आलेला पाहायला मिळणार आहे अर्थात याचे सर्व श्रेय जयदीपलाच जात असून यात माईंची देखील खंबीर साथ त्यांना मिळताना दिसत आहे. मालिकेत जयदीप गौरीला एका पार्टीमध्ये घेऊन जाणार असतो परंतु पार्टीत गेल्यावर आपला लूक पाहून लोकं काय म्हणतील म्हणून गौरी जयदीपकडून सर्व काही शिकून घेताना दिसत आहे.

अगदी जेवताना काटा चमचा कसा वापरायचा हेही तिने शिकून घेतले आहे. आता तर जयदीप गौरीला डान्स देखील शिकवत आहे. त्यामुळे या दोघांमध्ये जवळीक वाढल्याचे दिसत आहे. मालिकेतील या सर्व घडामोडी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करताना दिसत आहे. त्यात गौरी पार्टीच्या वेळी मॉडर्न लूकमध्ये दिसणार असल्याने आता तर मालिका अधिक उत्कंठावर्धक होताना दिसत आहे. साध्या सोज्वळ गौरीचे झालेले हे ट्रान्सफॉर्मेशन प्रेक्षक नक्कीच स्वीकारणार आहेत मात्र मालिकेत यापुढेही तिने असेच राहावे अशीच प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून आता मिळताना दिसत आहे. पुढे जाऊन शालिनी आणि देवकीला देखील तिने चांगला धडा शिकवावा अशीच अपेक्षा आता प्रेक्षकवर्ग देखील करत आहेत. गौरीमध्ये होत असलेला हा बदल माईंना जरी आवडला असला तरी शालिनी आणि देवकी मात्र यावर कशा रिऍक्ट होतात हे येत्या काही भागातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मालिकेचे शूटिंग सध्या गोव्यामध्ये पार पडत आहे. जयदीप आणि गौरी ज्या पार्टीत जाणार आहेत त्याचे शूटिंग देखील नुकतेच पार पडले असून गौरिचा नवा लूक प्रेक्षकांसमोर आला आहे.

त्यामुळे पार्टीमध्ये काय काय घडणार आहे हे लवकरच येत्या काही भागात प्रेक्षकांसमोर येईल. मात्र यामध्ये माईना गौरीचा हा नवा लूक आवडेल का किंवा तिने घातलेला पार्टीतला ड्रेस माईंना आवडेल का ? याचेही उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल तुर्तास मालिकेच्या प्रेक्षकांसाठी अजून एक बाब समोर येत आहे आणि ते म्हणजे गोव्यामध्ये होत असलेल्या मालिकांचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव गोवा सरकारने हा निर्णय घेतल्याने काही दिवसांसाठी पुन्हा मालिका बंद होणार आहेत. बहुतेक मराठी मालिका गोव्यात चित्रीकरणासाठी गेल्या होत्या त्या सर्वांसाठी ही खेदाची बाब म्हणावी लागणार आहे. परंतु असे असले तरी मालिकेच्या टीम याबाबत लवकरच निर्णय घेतील तशी अपडेट वेळोवेळी मिळतीलच तुर्तास मालिकेचे पार्टीचे चित्रित झालेले काही एपिसोड तरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार हे नक्की…